Maharashtra Politics : शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले; दोन नेत्यांच्या नावांची घोषणा

Vidhan Parishad Election 2024 : शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले; दोन नेत्यांच्या नावांची घोषणा
Uddhav Thackeray Saam TV
Published On

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडल्यानंतर आता २६ जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आपले दोन उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले; दोन नेत्यांच्या नावांची घोषणा
Narendra Modi : सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; मतदारांना केलं खास आवाहन

तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांचे उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

येत्या २६ जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आतापासूनच मोर्चबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेकडून दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या नावाचा समावेश आहे.

अनिल परब हे विधानपरिषदेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी परिवहन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते.

दुसरीकडे ज. मो. अभ्यंकर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय ते शिवसेना ठाकरे गटाच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

विधानपरिषद निवडणुकीचे नवे वेळापत्रक

दरम्यान, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका १० जून रोजी होईल, असं यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात शिक्षकांना सुट्ट्या असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता २६ जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार असून १ जुलै रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे-फडणवीस पुन्हा राजकीय सामना रंगणार आहे.

शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले; दोन नेत्यांच्या नावांची घोषणा
Marathwada Drought: राज्यात दुष्काळ, नेते टूरवर? पाणीटंचाईच्या बैठकीला मंत्र्यांची दांडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com