Marathwada Drought: राज्यात दुष्काळ, नेते टूरवर? पाणीटंचाईच्या बैठकीला मंत्र्यांची दांडी

Marathwada Water Shortage: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये आज आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला पालकमंत्री आणि मंत्र्यांची दांडी मारल्याचं पाहायला मिळालंय.
राज्यात दुष्काळ, नेते टूरवर? पाणीटंचाईच्या बैठकीला मंत्र्यांची दांडी
Marathwada Water Shortage MeetingSaam Tv

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक पार पडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पाणीटंचाईवर ही बैठक पार पडली. मात्र या बैठकीला पालकमंत्री आणि मंत्र्यांची दांडी मारल्याचं पाहायला मिळालंय. कारण मराठवाड्यातील काही मंत्री परदेशी दौऱ्यावर आहेत. तर काही मंत्री देवदर्शनासाठी गेलेत. त्यामुळे मंत्री आणि पालकमंत्री दुष्काळ बैठकीला गैरहजर राहिलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत. अब्दुल सत्तारही परदेशात आहेत. तर अतुल सावे, संजय बनसोडे, देवदर्शनाला गेले आहेत. मंत्री, पालकमंत्री ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार होते, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठलाय. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मैलोनमैल भटकंती करावी लागतेय. मराठवाडा आणि विदर्भातील पाण्याची समस्या गंभीर आहे. सध्या राज्यात 3 हजार 455 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतोय. यात सर्वाधिक टँकरची संख्या मराठवड्यात आहे.

बैल बाजारात बैल विक्रीची संख्या वाढली

यातच टँकरच्या पाण्यावर माणसाची तहान भागवण्याची वेळ आल्यानं पशुधनासाठी लागणारे पाणी आणि चारा आणायचा कुठून हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे जिवापाड जपलेल्या जनावरांना बाजारात मिळेल, त्या भावात विकताना शेतकरी दिसत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर मराठवाड्यातील अनेक ठिकाणच्या बैल बाजारात बैल विक्रीची संख्या वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर जवळच्या महालगाव इथल्या आज बैल बाजारात मोठ्या संख्येने बैल विक्रीला आले आहेत. माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, तर जनावरांना आणायचं कुठून? असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात चाराही आता संपत आल्यामुळे घराच्या दावणीला बांधण्यापेक्षा मिळेल त्या किमतीवर बैल विक्री करताना शेतकरी दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com