Water Crisis : घोटभर पाण्यासाठी संघर्ष; खडीमल गावात पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने टँकर हाच पर्याय

Amravati News : दरवर्षी उन्हाळा लागला की मेळघाटातील अनेक गावांमधील आदिवासी महिलांना तीन ते चार किमी अंतर पायपीट करून विहिरीतून पाणी आणून तहान भागवावी लागते
Water Crisis
Water CrisisSaam tv

अमर घटारे 

अमरावती : राज्यातील अनेक भागात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाय गावात टँकर आले कि पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी होताना पाहण्यास मिळत आहे. अशात अमरावती जिल्ह्यातील खडीमल गावात शासनाच्या योजना अजूनही न पोहचल्याने पाणी टंचाईचे दाहक वास्तव पाहण्यास मिळत आहे.  

Water Crisis
Amravati News : अमरावती जिल्ह्यातील ८ तालुक्यातील पाणी नमुने दूषित; २५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र आदिवासींच्या नशिबी असलेल्या समस्या, प्रश्न अजूनही कायम आहेत. दरवर्षी उन्हाळा लागला की (Melghat) मेळघाटातील अनेक गावांमधील आदिवासी महिलांना तीन ते चार किमी अंतर पायपीट करून विहिरीतून पाणी आणून तहान भागवावी लागते. याच श्रुखंलेत जिल्ह्यातील खडीमल हे गाव देखील येते. (Amravati) जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई म्हणून खडीमल गावाची ओळख आहे. हे गावात पाणी टंचाईत देशपातळीवर चर्चेला गेलं. मात्र या ठिकाणी घोटभर पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. 

Water Crisis
Nandurbar News : सात वर्षांपासून २ हजार ८२९ सिंचन विहिरींचे कामे अपूर्ण; नंदुरबार जिल्ह्यातील चित्र

तीन महिन्यापूर्वीच आटले पाण्याचे स्रोत 

या गावात गावात टँकर आला, की भीषण अशी गर्दी पाणी भरण्यासाठी दिसून येत आहे. त्यामुळे या गावात पाणीबाणी निर्माण (Water Scarcity) झाली आहे. गेल्या तीन महिन्यापासून या गावातील सर्वच पाण्याचे स्रोत तीन महिन्यापूर्वीच आटले आहे. तर गावात पेयजल योजना नाही, हरघर नल ही योजना या गावात अद्यापही नाही. त्यामुळे घरोघरी नळ या योजनेचा दावा या गावात फेल झाला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com