सचिन जाधव, पुणे| ता. १ डिसेंबर २०२३
सर्वोच्च न्यायालयाने सर्व दुकानांवरील इंग्रजी पाट्या काढून मराठीमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही दुकानांवरील पाट्यांवर इंग्रजीचे आक्रमण पाहायला मिळत आहे. या प्रकरणी महापालिकेकडूनही कोणती कारवाई केली जात नसल्याने पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील जंगली महाराज रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुकानांवरील इंग्रजी पाट्या हटवण्यासाठी मनसेने पुण्याच्या जंगली महाराज रोडवर (JM Road, Pune) आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठी केलेल्या दुकानांवर कायदेशीर कारवाई करावी याबाबत महानगरपालिकेला मनसेने पत्रही दिले होते.
यावेळी पुण्यातील (Pune MNS) मनसे कार्यकर्त्यांकडून जंगली महाराज रोडवरील चार-पाच दुकानांवरील असणाऱ्या इंग्रजी पाट्याही फोडण्यात आल्या. त्याचबरोबर टिळक रोडवरील मराठी पाट्या न लावलेल्या अनेक दुकानांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली.
दरम्यान, आंदोलनकर्त्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अलका चौका (Alka Chouk) अडवल्यानंतर काही काळ तणावाची परिस्थी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले. यावेळी दुकानांवरील पाट्या मराठीत करा अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी साईनाथ बाबर यांच्यासह पुण्यातील मनसे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.