Mumbai News: मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; दुसऱ्या दिवशी १६१ दुकानदारांवर कारवाई

Mumbai News: पालिकेने २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली होती. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी १६१ दुकानांवर कारवाई केली.
BMC
BMCSaam TV
Published On

Mumbai Latest News:

मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मुंबई महापालिकेने दुकानदारांना २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली होती. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी १६१ दुकानांवर कारवाई केली. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिका क्षेत्रात २८ नोव्हेंबरपासून आता दुकाने आणि आस्थापनांवर मराठीत नामफलक लावणे बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशांची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

या कारवाईनिमित्त आज बुधवारी मुंबई महापालिकेने ३ हजार ५७५ दुकाने आणि आस्थापनांना भेटी दिल्‍या. या भेटीदरम्यान, पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी १६१ दुकानांवर कारवाई केली.

BMC
Prakash Ambedkar News: 'उमेदवार निवडून येत नाही, तर...; प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएम मशीनवर व्यक्त केली मोठी शंका

पालिका प्रशासनाकडून दुकानांवर कारवाई करण्यसाठी पथके तैनात केली आहेत. या पथकांनी काल, मंगळवारी ३ हजार २६९ दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्या. या कारवाईदरम्यान, पालिका प्रशासनाच्या पथकाने १७६ दुकानांवर कारवाई केली. तर गेल्या दोन दिवसांत प्रशासनाच्या पथकांनी ३३७ दुकानांवर कारवाई केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BMC
Datta Dalvi News: माजी महापौर दत्ती दळवींच्या कारची तोडफोड, मुख्यमंत्र्यांवर केली होती आक्षेपार्ह टीका

या पुढील काळातही ही कारवाई सुरू राहणार आहे. तसेच मुंबईतील सर्व दुकांनावर मराठीत नामफलक लावण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com