Datta Dalvi Bail: दत्ता दळवींना अखेर जामीन मंजूर; कोर्टानं घातल्या ५ महत्वाच्या अटी

Datta Dalvi Gets Bail Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दत्ता दळवी यांना आज, शुक्रवारी जामीन मिळाला. मुलुंड न्यायालयानं काही अटींवर त्यांना जामीन मंजूर केला आहे.
Datta Dalvi Gets Bail By Mulund Court In Objectionable Statement on Cm Eknath Shinde Case - Latest News Marathi
Datta Dalvi Gets Bail By Mulund Court In Objectionable Statement on Cm Eknath Shinde Case - Latest News MarathiDatta Dalvi Bail - Saam Tv
Published On

Datta Dalvi Bail Updates:

विनय म्हात्रे, मुंबई प्रतिनिधी | १ डिसेंबर २०२३

मुलुंड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेले ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना आज, शुक्रवारी जामीन मिळाला. मुलुंड न्यायालयानं काही अटींवर त्यांना जामीन मंजूर केला आहे.

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दळवींना अटक केली होती. दोन दिवसांपासून ते तुरुंगात होते. त्यांना आज मुलुंड न्यायालयानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने (Court) काही अटी घातल्या आहेत. ठाणे तुरुंगातून आजच दळवी यांची सुटका होईल, असे सांगितले जात आहे.

कोणताही समाज आणि समूहाविरोधात दत्ता दळवी यांनी अवमानकारक वक्तव्य न केल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या 'हेट स्पीच'चीही नोंद घेतली आहे.

न्यायालयानं काय म्हटलं?

'४१ अ' ची नोटीस न देता दत्ता दळवी यांना अटक केल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला होता. त्याची न्यायालयानं नोंद घेतली. पोलिसांनी कलम १५३ गैरलागू केल्याचाही दावा दळवींच्या वकिलांनी केला होता. तो इथे मान्य होऊ शकत नाही, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं आहे. दळवी यांचं वय आणि मेडिकल हिस्ट्रीही न्यायालयानं लक्षात घेतली. त्यांनी याबाबत सादर केलेले पुरावे न्यायालयाने मान्य केले.

दळवींना या अटींवर जामीन

> या प्रकरणाचा तपास संपेपर्यंत काही प्रतिबंध लागू

> मुख्यमत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई

> कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई

> पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक

> कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com