शहीद संतोष जगदाळेंची कन्या झाली सरकारी अधिकारी; कोणत्या पदावर झाली नियुक्ती?

Asawari Jagdale : शहीद संतोष जगदाळेंची कन्या सरकारी अधिकारी झाली आहे. पुणे महापालिकेत तिची नियुक्ती झाली आहे.
pmc Standing
pmc Standing CommitteSaam tv
Published On
Summary

शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्येला अखेर सरकारी नोकरी मिळाली

आसावरी जगदाळेची प्रशासकीय अधिकारी (वर्ग-२) पदावर नियुक्ती करण्यात आलीये

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

शहीद संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिला महापालिकेत नोकरी मिळाली आहे. आसावरी संतोष जगदाळे हिला पुणे महापालिकेत नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आलं. यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसावरीचे फोन करून अभिनंदन केले. पुणे महापालिकेत महापौर मंजुषा नागपूरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर आणि आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत देण्यात नियुक्ती पत्र देण्यात आले. आसावरी जगदाळे ही संतोष जगदाळे यांची मुलगी असून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यात महाराष्ट्रातील देखील काही पर्यटकांनी कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट, जवळचे नातेवाईक गमावले होते. त्यामध्ये, पुण्यातील रहिवासी संतोष जगदाळे यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारने आसावरी जगदाळे यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून महापालिकेत नोकरी सरकराने दिली आहे.

pmc Standing
प्रशासनात मोठा उलटफेर होणार; 8 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीची शक्यता, थेट दिल्लीत पोहोचली चर्चा

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचे निधन झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर जगदाळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून त्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करत शहीद संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत 'प्रशासकीय अधिकारी' (वर्ग-२) म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

pmc Standing
मोठी बातमी! भाजपच्या माजी मंत्र्याला अटक; पुणे पोलिसांच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ

'मी सर्वांचे आभार मानते. माझ्या मुलीने प्रामाणिकपणे काम करावं एवढीच अपेक्षा तिच्याकडून असल्याचं तिच्या आईने सांगितला. नोकरी मिळाल्यानंतर इतर नेत्यांनीही आसावरीचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com