Nira- Baramati Road : गरोदर महिलेला मारहाण; संतप्त कुटुंबीयांचा रास्ता रोको

Baramati News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ धनगर कुटुंबियांच्यावतीने माळेगाव बंदची हाक
Baramati News
Baramati NewsSaam tv
Published On

बारामती : माळेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून गरोदर असलेल्या महिलेला मारहाण करण्यात आली होती. (Baramati) सदरची घटना आठ दिवसांपूर्वी घारडली होती. महिलेला झालेल्या या मारहाणीच्या निषेधार्थ नीरा- बारामती रोडवर धनगर कुटुंबियांच्यावतीने आज (Rasta Roko Andolan) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. (Maharashtra News)

Baramati News
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मास्टरप्लान; अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीद्वारे वाहनांवर लक्ष ठेवणार

गेल्या आठ दिवसांपासून माळेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ धनगर कुटुंबियांच्यावतीने माळेगाव बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज धनगर कुटुंबीयांच्या वतीने निरा- बारामती रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Baramati News
Unseasonal Rain: गारपीट, पावसाने पीक गेले वाया; पालकमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांना अश्रू अनावर

आठ दिवसापासून पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल न केल्याने धनगर कुटुंबीय प्रचंड आक्रमक झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये; यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र या घटनेमुळे माळेगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com