Pune News
Pune NewsSaam TV

Pune News: तृणधान्याचे क्षेत्र सोलापुरात, केंद्र मात्र बारामतीला! जीआर रद्दची नागरिकांची मागणी

Foodgrain News: पुणे जिल्ह्याच्या तुलनेत तृणधान्याचे क्षेत्र सोलापुरात सर्वाधिक असतानाही श्री अन्न उत्पादकता केंद्र बारामतीला गेले आहे. त्यामुळे हे केंद्र बारामतीला गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Published on

Solapur News:

सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र तृणधान्याखालील असून पुणे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरपर्यंतच आहे. बारामती तालुक्यात ज्वारीसह रब्बी पिकांखालील क्षेत्र अंदाजे ४० हजार हेक्टरपर्यंत असून सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी तीन लाख १८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी होते.

Pune News
Nashik Crime : नाशिकमध्ये धक्कादायक घटना; धुडगूस घालणाऱ्यांना टोकलं; मद्यपींनी केली लष्करातून निवृत्त झालेल्या जवानाची हत्या

पुणे जिल्ह्याच्या तुलनेत तृणधान्याचे क्षेत्र सोलापुरात सर्वाधिक असतानाही श्री अन्न उत्पादकता केंद्र बारामतीला (Baramati) गेले आहे. त्यामुळे हे केंद्र बारामतीला गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात तीन लाख ९७ हजार हेक्टर तृणधान्याखालील क्षेत्र असून पुणे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरपर्यंतच आहे. बारामती तालुक्यात ज्वारीसह रब्बी पिकांखालील क्षेत्र अंदाजे ४० हजार हेक्टरपर्यंत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यात दरवर्षी तीन लाख १८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी होते. पुणे जिल्ह्याच्या तुलनेत तृणधान्याचे क्षेत्र सोलापुरात सर्वाधिक असतानाही श्री अन्न उत्पादकता केंद्र बारामतीला गेले आहे.

राज्याच्या कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास -मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने १७ एप्रिल रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्याअंतर्गत राज्यात श्री अन्न अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे नमूद आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या काळात हे अभियान राबविले जाणार असल्याचे म्हटले आहे.

अभियानातून कृषी परिषदा, जिल्हास्तरीय कृषी महोत्सव, मिलेट दौड, पाककला, कृती स्पर्धा, आहारतज्ज्ञांची व्याख्याने असे कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्था हैदराबाद या संस्थेसोबत सामंजस्य करार करून सोलापूर येथे तृणधान्य मूल्यसाखळी विकास प्रकल्पात काम करणाऱ्या शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांची क्षमता बांधणीसाठी श्री अन्न क्षेत्र उत्कृष्टता केंद्र मंजूर झाले. त्यासाठी ३० कोटींची तरतूद आहे. मात्र हा प्रकल्प आता बारामतीला हलवण्यात राजकीय वतृळासह सामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरूये.

Pune News
Baramati Ajit Pawar Speech : मराठा,धनगर आरक्षणावर भूमिका मांडत जरांगे पाटील भुजबळांना सुनावले खडेबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com