सुशील थोरात
अहमदनगर : अवकाळी पावसाने सर्वत्र नुकसान केले आहे. या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यात (Ahmednagar) अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही भागात गारपिटीने आणि मुसळधार पावसाने हातात तोंडाशी आलेले (Farmer) शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाहणी दरम्यान शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. (Latest Marathi News)
राज्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी (Rain) पाऊस बरसत आहे. यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त करत आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील गारपीट भागात झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांना त्यांचे अश्रू आवरता आले नाही.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पिकाला मुलासारखं वाढवलं लाईट नसताना पाणी देण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर करून फळबागा आणि उसासारखं पीक जगवलं. तेच पीक काही क्षणात जमीन दोस्त झालेला पाहून पठारे कुटुंबीयांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सरकारने गारपीट झालेल्या गावांमध्ये जास्तीत जास्त मदत करून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची नितांत गरज आहे; अशी भावना ही यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.