Pune GBS New Cases Updates Meta Ai
मुंबई/पुणे

Pune GBS News : पुणे शहरात जी बी एसचा पहिला बळी, ५६ वर्षांच्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune GBS New Cases Updates : पुण्यात जी बी एसचे नवीन १६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील जी बी सिंड्रोमग्रस्त रुग्णांची एकूण संख्या १२७ वर गेली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरु आहेत.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune GBS News : पुण्यासह राज्यभरात जी बी सिंड्रोमने थैमान घातले आहे. पुण्यासह नागपूर, सोलापूर, कोल्हापूरातही जीबीएसने शिरकाव केला आहे. आता सिंड्रोमबाबत नवी माहिती समोर आली आहे. आज (२९ जानेवारी) पुण्यात नवीन १६ जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १२७ वर गेली आहे.

पुणे शहरात जी बी सिंड्रोममुळे पहिला मृत्यू झाला आहे. मृत महिला कॅन्सरग्रस्त होती. १५ जानेवारी रोजी ससून रुग्णालयात करण्यात आले होते. जी बी एसमुळे पुणे विभागातला हा दुसरा मृत्यू आहे. सिंहगड रोड परिसरात राहत असलेली ही महिला ५६ वर्षांची होती. याआधी एका रुग्णाचा जीव जी बी एसमुळे गेला.

जी बी एस रुग्णसंख्या वाढत असल्याने पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जी बी सिंड्रोममुळे सोलापूरमधील ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. आज पुणे शहरात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. याच धर्तीवर महापालिकेने आजार टाळण्यासाठी काय काय करायला हवे यासंबंधित पत्रक प्रसिद्ध केले आहे.

आजार टाळण्यासाठी महानगरपालिकेने नमूद केल्या महत्त्वाच्या गोष्टी:

- पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी उकळून व नंतर थंड करून प्यावे.

- पुणे महानगरपालिकेमार्फत मेडीक्लोरच्या बाटल्यांचे वाटप केले जात असून पाण्याच्या शुद्धीकरणासाठी नागरिकांनी त्याचा वापर करावा.

- अन्न स्वच्छ व ताजे असावे तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

- शिजलेले अन्न व न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.

- जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.

- अन्नपदार्थ हाताळताना प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवा.

- खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय व महापालिका आरोग्य यंत्रणांना कळवावे.

- GBS या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळील शासकीय अथवा पुणे महानगरपालिका रुग्णालयांशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT