Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची मोठी अपडेट; सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर

Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.
Comrade Govind Pansare Case Update
Comrade Govind Pansare Case UpdateSaam Tv
Published On

Comrade Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाद्वारे सर्व सहा आरोपींचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये हत्या झाली होती.

जस्टीस ए. एस. किलोर यांच्या एकल खंडपीठाने हत्या प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुराणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींनी जामीनाचा अर्ज केला होता. २०१८ आणि २०१९ मध्ये आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किलोर यांनी या हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'बऱ्याच कालावधीपासून हत्या प्रकरणातील आरोपी कारावासात आहेत. प्रदीर्घ कारावास भोगलेल्या या आरोपींचा जामीन अर्ज मी स्विकारत आहे. आणखी एक आरोपी वीरेंद्रसिंह तावडेच्या जामीन अर्जावर स्वतंत्रपणे सुनावणी होणार आहे.'

Comrade Govind Pansare Case Update
HSC-SSC Exam: परीक्षेसाठी बुरखा घालून परिक्षा केंद्रात प्रवेश नको; नितेश राणेंचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन मंजूर झाल्यानंतर पानसरे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात जाणाच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. वकिलांचा सल्ला घेऊन लवकर निर्णय घेणार असल्याची माहिती स्नुषा मेघा पानसरे यांनी दिली आहे.

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कम्युनिस्ट पार्टीचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा कोल्हापूरच्या सम्राट नगर परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा एक दुचाकी त्यांच्याजवळ आली आणि बाईकवरील दोघांनी पानसरेंवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. यात गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला होता.

Comrade Govind Pansare Case Update
Santosh Deshmukh Case: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल; धनंजय मुंडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com