
सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी
Ind Vs Eng 4th T-20 Match : पुण्यासह राज्यभरात जीबी सिंड्रोम आजाराने थैमान घातलं आहे. आतापर्यंत पुण्यात या आजाराचे १११ रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. हा आजार इतर जिल्ह्यांमध्येही पसरत आहे. नागपूर, सोलापूर, कोल्हापूरातही जीबीएसने शिरकाव केला आहे. दरम्यान पुण्यातील गहुंजेमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामना होणार आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे खबरदारी घेण्यात आली आहे.
येत्या ३१ जानेवारीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड टी-२० मालिकेतील चौथा सामना होणार आहे. या दरम्यान पुण्यात जीबी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांध्ये वाढ होत असल्याने असोसिएशनकडून खबरदारी घेतली जाणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार, स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मोफत स्वच्छ पाणी दिले जाणार आहे.
असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे यांना याविषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, "शहरात आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या अनुषंगाने राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन होणार आहे. मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. प्रेक्षकांना शुद्ध पाणी मोफत दिले जाणार आहे."
"पार्किंगची समस्या होऊ नये यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे, ४५ एकर जागा पार्किंगसाठी घेतली आहे. प्रेक्षकांना पार्किंगदेखील मोफत असणार आहे. सोशल मीडियावर यासंबंधित सर्व माहिती शेअर करण्यात आली आहे. प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे' असे बोबडे यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.