Pimpri chinchwad seven men killed themselves in one day
Pimpri chinchwad seven men killed themselves in one daySaam Tv

Pimpri-Chinchwad : धक्कादायक! एका दिवसात ७ जणांच्या आत्महत्या; पिंपरी चिंचवड हादरलं

Pimpri-Chinchwad Suicide News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवसात तब्बल सात नागरिकांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Published on

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल सात जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात एकाच दिवशी वेिविध ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये एकाच दिवशी सात जणांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. या प्रकरणामुळे शहरात चिंतेचे वातावरण व्यक्त करण्यात येत आहे. सर्व आत्महत्या प्रकरणाचा तपास पिंपरी चिंचवडमधील पोलीस करत आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी गौरव ज्ञानेश्वर आगम (वय २८ वर्ष), प्रसाद संजय अवचट (वय ३१ वर्ष), विकास रामदास मुरगड (वय ३५ वर्ष), मनाप्पा सोमल्या चव्हाण (वय ५२ वर्ष), नवनाथ भगवान पवार (वय ४६ वर्ष), सुवर्णा श्रीराम पवार (वय ३६ वर्ष) , दिनेश सुरेश लोखंडे (वय ४० वर्ष) यांनी आत्महत्या केल्यांची नोंद झाली आहे.

Pimpri chinchwad seven men killed themselves in one day
Govind Pansare Case : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाची मोठी अपडेट; सर्व सहा आरोपींना जामीन मंजूर

वाढता ताणतणाव, मानसिक आजारपण याव्यतिरिक्त कर्जबाजारीपणा, कौटुंबित वाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शहरी आणि निमशहरी भागामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Pimpri chinchwad seven men killed themselves in one day
Santosh Deshmukh Case: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल; धनंजय मुंडे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com