Pune Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain: पुण्यात ढगफुटी, रस्त्याला नदीचे स्वरूप, बारामतीत इमारती खचल्या, NDRF दाखल

Baramati Rain Update Today: कालपासूनच राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. बारामतीत तर पावासाने उच्चांकी गाठली आहे. बारामतीत अनेक ठिकाणी ढगफुटीदेखील झाली आहे.

Siddhi Hande

राज्यात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस हा पुणे जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचसोबत अनेक ठिकाणी ढगफुटीदेखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री बारामतीत कालवा फुटला, यामुळे सर्व पाणी शेतात गेले.

यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज सकाळी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शेतीचा पाठपुरवठा करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहे.शहरात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले. गेल्या चार दिवसांत शहर आणि परिसरातील पावसाची तीव्रता वाढली.(Pune Heavy Rainfall Update)

हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता त्यानुसार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.पुणे जिल्ह्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पावसाने जिल्ह्यातील काही भागांना अक्षरशः झोडपून काढले.त्यामुळे ओढ्यांना पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरणे, नागरिक अडकणे अशा घटना घडल्या. प्रशासनाला मदतकार्यासाठी पथके रवाना करावी लागली आहेत.

बारामतीत ढगफुटी (Baramati Rainfall)

बारामतीमध्ये निरा डावा कालवा फुटलेला आहे. त्यातून अजूनही पाणी सुरू आहे . वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आलेला तर अनेक शेतीचं मोठं नुकसान या कालव्यामुळे झालेलं आहे तर गाड्याही रस्त्यावरती अडकलेल्या आहेत. याची पाहाणी अजित पवारांनी केली. तसेच बारामतीत अनेक ठिकाणी ढगफुटीदेखील झाली. यामुळे तीन ते चार इमारती खचल्या आहेत. इमारतीच्या भिंतींना भेगा गेल्या आहेत.

NDRF चे पथकं पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तैनात

एन डी आर एफ चे पथकं बारामती आणि इंदापूर मध्ये तैनात करण्यात आले आहे.पाण्याच्या कालव्यांमधील भगदाडांमुळे अनेक सखल भागातील रहिवासी परिसरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने पथकांना तैनात करण्यात आले आहे.बारामतीमधील कारा नदी आणि इंदापूरमधील नीरा नदीचे पाणी पातळी मध्ये वाढ झाली आहे.

पुण्यात सर्वाधिक पावसाची नोंद

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाला बारामती आणि इंदापूर मधील पावसाचा अहवाल सादर केला आहे.बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झालेल्या पावसाची आकडेवारी अहवालातून समोर आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात ८३.६ मिमी पाऊस तर इंदापूर मध्ये ३५.७ मिमी पाऊस

बारामती मधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी

बारामती: ७७ मिमी

माळेगाव: ८२.८ मिमी

पनदरे: १०४.८ मिमी

वडगाव: ९६.३ मिमी

लोणी: ८६ मिमी

सुपा: ७६ मिमी

मोरगाव: ७५.५

उडवडी: ८५.३

शिर्सुफळ: ७४.३

इंदापूर मधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी

भिगवण: ६३.३ मिमी

इंदापूर: २३.५ मिमी

लोणी भापकर: ४८.३ मिमी

बावडा: २३ मिमी

काटी: २६.५ मिमी

निमगाव केतकी: १८ मिमी

अंथुरने: ४४ मिमी

पळसदेव: ४८.३ मिमी

लाखेवाडी: २६.५ मिमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT