
एनडीआरएफचे पथकं बारामती आणि इंदापूरमध्ये तैनात
पाण्याच्या कालव्यांमधील भगदाडांमुळे अनेक सखल भागातील रहिवासी परिसरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने पथकांना तैनात करण्यात आले आहे
दरम्यान, बारामतीमधील पथक आता सोलापूर जिल्ह्यातील एकशिव येथील मार्कड वस्तीच्या दिशेने मार्गस्थ झालं आहे
बारामती व इंदापूर तालुक्यांसाठी एनडीआरएफच्या दोन तुकडया रवाना....काही वेळातच बारामती व इंदापूरमध्ये पोहोचणार...उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती
पुण्यातील बहुतांश परिसरात जोरदार पावसाला सुरुवात
पुणे शहरात सर्वदूर मुसळधार पाऊस
मध्वर्ती भागासह उपनगरात जोरदार पावसाच्या सरी बरसायला सुरुवात
उल्हासनगरमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. समर कॅम्पमधील डान्स टीचरने हे दुष्कृत्य केलं असून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत या नराधम डान्स टीचरला बेड्या ठोकल्या आहेत.
पूर्व द्रुतगती मार्गावर गाडीचा दुचाकीला धक्का लागल्यानंतर दुचाकीस्वराने कार चालकाच्या छाती चाकू भोसकला. पूर्व द्रुतगती मार्गावर काही वेळापूर्वी घडली घटना घडलीय. यात झीशान शेख नामक कार चालकाचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. पळून गेलेल्या आरोपी दुचाकीस्वरचा शोध सुरू आहे.
वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसानं सिन्नर तालुक्याला झोडपलं.
अवघ्या काही मिनिटात सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
वादळी वारा आणि पावसाने सिन्नर बस स्थानकावरील छत कोसळलं
सिन्नर बस स्थानकावरील सहा नंबर प्लॅटफॉर्मवर छत कोसळलं
छतासह बस स्थानकाच्या काही भाग देखील कोसळला
बस स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट दिला होता. नाशिकच्या येवला शहर व परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरातील काही भागात पाणी साचले तर मनमाड शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.
माण तालुक्याच्या बहुतांश भागात रविवारी धुवाधार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दहिवडी-फलटण, शिंगणापूर- फलटण, आंधळी-मलवडी, मलवडी-कुळकजाई, राजवडी-बिजवडी हे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच शिंगणापूर परिसरात सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असल्याने त्याही भागात पाणीच पाणी साचले आहे. माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसराला रविवारी पावसाने झोडपून काढले.
बारामती तालुक्यातील निरा डावा कालवा पाण्याच्या वेगामुळे फूटला असून हजारो लिटर पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर येऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बारामती तालुक्यातील पिंपळी या ठिकाणी निरा डावा कालवा फुटला असून शेतकऱ्यांच्या शेतात घरामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे.
काटेवाडी भवानीनगर हा रस्ता तूर्तास बंद करण्यात आला आहे.
शिरपूरच्या वाठोडा येथे आईची लाकडी दांडक्याने मारून निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकरी मुलाच्या थानेर पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुसक्या आवळल्या आहेत, शिरपूरच्या थाळनेर येथील वाठोडे गावात मुलानेच आईची लाकडी दांडक्याने मारहाण करत निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती,
आईने बनवलेले मासे हे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून या मुलाने आईची निर्घुण पणे हत्या केली आहे,
आनंदाची बातमी समोर येत आहे मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. यावर्षी राज्यात आठवडाभर आधीच मान्सून दाखल झाला आहे.
नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू मनमाड च्या साईराज परदेशी याने बिहार येथे झालेल्या स्पर्धेत वेतलिफ्टिंग स्पर्धेत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मध्ये देशातील खेळाडू चा गौरव केला त्यात मनमाड च्या साईराज परदेशी याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्याचे कौतुक केल्याने ही बाब मनमाडकर जनते साठी अभिमानाची व गौरवास्पद असल्याने सर्वच स्थरातून साईराज परदेशी याचे कौतुक होत आहे..
वाशिम जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस बरसतोय यात अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यामूळ नुकसानीच्या घटना घडत आहेत,अशीच एक घटना वाशिमच्या पिंपळगाव येथे घडली आहे, पिंपळगाव येतील शेतकरी राहुल दंडे याच्या जनावरांच्या गोठाच छत मोडून पडलय, यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून, जनावरांकरीता साठवलेला चारा आणि खाद्य भिजून खराब झालंय, तर छत पडल्याने काही जनावर जखमी सुद्धा झाली आहेत.
अमरावती शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे,या पावसाने मात्र आता जनजीवन विस्कळीत झाले आहे, उन्हाळी शेती पिकांचे अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे, तर 31 मे पर्यंत पावसाचा इशारा अमरावती जिल्ह्यासह विदर्भात देण्यात आला आहे,सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे मान्सूनपूर्व शेती मशागतीचे काम पूर्णपणे थांबली आहे, आजपासून तीन दिवस अमरावतीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी बारा ते एक च्या दरम्यान अमित शहा यांचे नांदेड मध्ये आगमन होईल.
उद्या दिवसभर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शंखनाद सभा असं नाव देण्यात आलेल आहे.
या सभेची भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या सभेची पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी पाहणी केली.पावसाचा अंदाज पाहता या मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे.
50 ते 60 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील येलदरी परिसरात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भुईमूग अवकाळी पावसाने नष्ट झाला आहे तर याआधी देखील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली हळद पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना आता सरकारने तातडीने मदत करावी अन्यथा आत्महत्याशिवाय पर्याय नसल्याचं नुकसानग्रस्त शेतकरी सांगत आहेत
निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न" या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे पुस्तक प्रकाशन सोहळा
पुढील ३-४ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे
नागरिकांनी सतर्क राहावे, जिल्हा प्रशासनाची माहिती
पावसाळा अद्याप सुरू व्हायचा बाकी आहे; मात्र, अवकाळी पावसातच पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील फातिमानगर परिसरातील रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली. रस्त्यांवरील खड्ड्यात गुडघाभर पाणी साचले आहे. रस्त्यांवरील डबक्यात कागदी होड्या सोडून स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेकडून महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. लवकरात लवकर पावसाळी कामे करावेत अशी मागणी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र रात्री पासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून वातावरण ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसाच्या तुलनेत आज पावसाची सरासरी थोडीशी मंदावलेली पाहायला मिळत आहे. आजचा एकूण पाऊस 127.4 इतका असून आजचा सरासरी पाऊस 15.9 एवढा झाला आहे.
लातूरच्या उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली चार वर्षाच्या चिमुकलीचा चिरडून मृत्यू झालाय... गावात वस्तीमध्ये भरधाव वेगात ट्रॅक्टर चालकांने ट्रॅक्टर चालवल्याने रस्त्यावर खेळणाऱ्या शिवकन्या खेळकर या चार वर्षीय चिमुरडीचा चिरडून जागीच दुर्दैवी अंत झाला आहे..
ट्रॅक्टर चालक गौस बागवान हा फरार झाला असून आहेत.. तर या घटनेने गावात शोककळा पसरली आहे..
सध्या महिला हुंडाबळी आणि महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत असताना नाशिकमध्ये पुन्हा एकदा एक महिला अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. मर्सिडीज कार ची मागणी करत माहेरून 25 लाख रुपये आणण्यासाठी स्नेहल घुले या डॉक्टर पत्नीचा आयटी इंजिनिअर पतीकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिलेचा पती, सासू- सासरे आणि दीर- ननंद यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे एक अपघात घडला. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसला. या अपघातात चालक व वाहक दोघेही जखमी झाले आहेत.
हा अपघात रात्रीच्या वेळेस घडण्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून या घटनेमुळे दुकान आणि तिथे पार्क केलेल्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी क्रेन साह्याने जखमींना कंटेनरमधून बाहेर काढले व त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मागच्या पाच दिवसापासुन सुरु असलेल्या पाऊसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडी वाढलीय या थंडीचा फटका शेळ्या मेंढ्यांना बसत असुन दोन मेंढ्याचा थंडीच्या हुडहुडीत मृत्यु झालाय तर दुसरीकडे शेतशिवार जलमय होऊन शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुढील काळात पाऊसाचा जोर कायम राहिल्यास पशुधनाला मोठी हानी होण्याची भिती व्यक्त केली जातेय
शरद पवार गटाच्या सत्यजीत पाटणकर यांच्या भाजपा प्रवेशाला दोन्ही छत्रपतीची मध्यस्थी
सत्यजीत पाटणकर यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
खासदार उदयनराजे भोसलेही सत्यजीत पाटणकर यांना भाजपात घेण्यासाठी आग्रही
पुढील आठवड्यात शकतीप्रदर्शन करीत होणार प्रवेश
वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका बंदरांमध्ये दाखल
यावर्षीचा मच्छिमारी हंगाम तोट्यात
मासेमारी हंगाम संपायला अजून 6 दिवस बाकी, मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यातही वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी ठप्प
शेवटच्या टप्प्यातील 25 कोटीहून अधिकची उलाढाल ठप्प
जिल्ह्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट
वादळी पावसाची शक्यता, ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन
वादळी पावसाच्या या इशाऱ्यामुळे मच्छिमारांनी नौका आणल्या बंदरात
मच्छिमारांना सहन करावा लागतोय मोठा आर्थिक फटका
-17 मे ला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवल्याने त्याचा मुलगा सुशील हगवणे हा फरार झाला होता त्यादरम्यान याच बोलेनो वाहनातून त्याने अनेक ठिकाणी प्रवास केला होत
-बलेनो कार बावधन पोलिसांनी केली जप्त
-आणखी किती वाहन आरोपी राजेंद्र हगवणे हा फरार असताना त्यांनी वापरली याचा तपास बावधन पोलीस घेत आहेत
वाहनांच्या लांबच लांब रांगा आज सकाळपासून लागल्या आहेत
रस्त्याचे अपूर्ण काम आणि निकृष्ट दर्जामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आणि पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते
टोल देऊनही रस्ता खराब आणि वाहतूक कोंडी होत असल्याने
प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीय
त्यात आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी झालीय
सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत
जिल्हाध्यक्ष पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही दिला राजीनामा.
उद्या बी.आर. कदम करणार अमित शहा यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदर अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय बी. आर. कदम यांची काँग्रेसमध्ये होती ओळख.
नाशिकच्या येवला शहरात भूमिगत गटारींचे काम सध्या सुरू आहे,मात्र हे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असल्याने संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील माती बाजूला टाकली नसल्याने अवकाळी बरसणाऱ्या पावसाने अनेक भागातील रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांना पायी जाण्यास अडचण तर अनेक वेळा वाहनधारकांना अडचण येऊन वाहने घसरली जात असल्याने छोटे अपघात घडत असल्याचा आरोप करत येवला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत रस्त्यात वृक्षांची रोपे ठेवत निषेध व्यक्त केला,ठेकेदाराने तातडीने रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
जालना जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसला आहे.जालना तालुक्यातील उमरी गावातील शेतकरी रामेश्वर गाडेकर यांच्या बीज कांदा पिकाच पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. पावसामुळं काढणीला आलेला बीज कांद्याचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.जालना तालुक्यातील उमरी , पाथरूड , सांगली तलाव या परिसरातील बीज कांदा उत्पादक शेतकरी मान्सूनपूर्व पावसामुळे चिंतेत सापडला आहे.दरम्यान सरकारने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करत आहे...
- पती अथर्व गुजराथी आणि सासरे योगेश गुजराथी या दोघांना गुजरातच्या नवसारीतून नाशिक पोलीसांनी केली अटक..
- सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचा भक्तीच्या आई वडीलांचा होता आरोप..
- याप्रकरणी कालच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची घेतली होती भेट
- पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर नाशिकच्या भक्ती गुजरातीच्या आत्महत्येचा प्रकार आला होता चर्चेत
बर्थडे पोलीस अधिकारी रंजीत कसले चे मोठमोठे दावे.
वाल्मीक कराडला सकाळी चहा तोही प्लास्टिकच्या कपामध्ये.
वाल्मीक कराडला 25 हजार रुपयांची कॅन्टीन.
मटन चिकन त्याचबरोबर घरगुती जेवण ही पुरवले जात आहे.
जिल्हा कारागृहात वाल्मीक कराडला जिल्हा कारागृह व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे.
वाल्मीक कराडला वाचण्यासाठी वेगवेगळे पेपर.
वाल्मीक कराडच्या जेवणामध्ये वेगवेगळे मेनू मागे ल ते जेवण दिले जात आहेत
महापालिकेच्या कामांचा निष्काळजीपणा
भर पावसाळ्यात पुणे महापालिकेने रस्त्यावर खोदाई काम करत आहे
मात्र हे करत असताना कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीये
त्यामुळे वारजे माळवाडी बस स्टॉप येथील मोठ्या खड्ड्यात बसची चाके अडकले
सुदैवाने कोणतीही जखमी नाही
आज सकाळी हा अपघात झाला आहे
वसई विरार शहरात सकाळपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शहरातील फळ भाजी विक्रेते यांना याचा फटका बसला आहे. शहरात जर अवकाळी पावसाने जोर धरला तर शहराच्या सकल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा
निलेश चव्हाण याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध
हुंडाबळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कलमवाढ
वैष्णवी यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा, २०१५ मधील ७५, ८७ ही कलमे वाढवली आहेत
तसेच बाळाला बंदिस्त परिस्थित ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलम वाढ करण्यात आली आहे
वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले होते
निलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली, अशी तक्रार कस्पटे कुटुंबीयांनी केली होती
त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे
सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही, टँकर चालक किरकोळ जखमी
सकाळी साडेसात वाजताच्या आसपास घडली घटना
सकाळी घाटात धुके पसरले असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने, चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज
सुदैवाने आजूबाजूला मनुष्य वस्ती नाही
वनविभागाची हद्द असल्याने वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे
वाशिमच्या रेल्वे स्थानक परिसरातील रुळांवर मोकाट जनावर मुक्तपणे संचार करत असल्याच बघायला मिळालं आहे, मोकाट आणि भटक्या जनावरांमुळे रेल्वेचा अपघात होऊन प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. आणि रेल्वे सेवा प्रभावित होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे या भटक्या आणि मोकाट जनावरांवर तात्काळ प्रतिबंध घालत जनावरांच्या मालकांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी होतीये.
सततच्या पावसामुळे नाशिकच्या येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली असून पाटोदा- शिरसगाव रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने यात पावसाच्या पाण्याने तळे साचत रस्ते चिकलमय झाले आहे,दरम्यान या रस्त्यांवरील खड्डे बुजून रस्ता दुरुस्त करावा या मागणी करता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करून गांधीगिरी पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे,या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढच्या वेळेस अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे एअरपोर्ट रोड,टिंगरे नगर पेट्रोल पॅम्प समोर अनेक दिवस पुणे महानगर पालिकाने लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधले,पण अनेक महिने त्या नवीन कोऱ्या शौचालयाला कुलूप लावून ठेवले आहे.एअरपोर्टला येजा करणारे नागरिकांना असुविधा होत आहे.तसेच विविध कंपन्याचे डिलिवारी बॉय यांना पण अ सुविधा होत आहे.त्या लोकांच्या तक्रारी काँग्रेस चे वडगावशेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांना प्राप्त झाल्या.सचिन भोसले यांनी क्षेत्रीकार्यालयातील अधिकाऱ्या शी ( संदेश तेली) संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली.सचिन भोसले यांनी त्या बंद शौचालया ची हार घालून पूजा करत निषेध व्यक्त केला.की शौ चालय काय पूजन्या ( पूजा करण्या) साठी बनविले आहे की काय.लवकरात लवकर चालू केले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
गुढीपाडवा ते मृग नक्षत्र पर्यंत विठ्ठल रुक्मिणी मातेला करण्यात येणार्या चंदन उटी पूजेतून मंदिर समितीला 14 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. येत्या 13 जून रोजी चंदन उटी पूजेची सांगता होणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात उष्णते पासून देवाला थंडावा मिळावा यासाठी गुढीपाडवा ते मृग नक्षत्र पर्यंत चंदन उटी पूजा केली जाते.
यावर्षी 43 दिवसांच्या पूजेतून मंदिर समितीला 14 लाख रुपये मिळाले आहेत. विठ्ठलाच्या पूजेसाठी 21 तर रूक्मिणीच्या पूजेसाठी 9 हजार रुपये देणगी शुल्क आकारण्यात आले आहे.
- सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाची संततधार
- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हवामान खात्याकडून चार दिवस पावसाचा अंदाज
- सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण
- गेल्या दहा ते बारा दिवसापासून कधी मोठ्या तर कधी मध्यम कधी हलक्या सरीचा पाऊस
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार
दुचाकीवरून ये जा करत असताना हटकल्याच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती
सुदैवाने कोणी यामध्ये जखमी झालेले नाही
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी रोहीत माने आणि त्याचा साथीदार कासीम अन्सारी या दोघांना अटक केली आहे
त्यांच्याकडून गावठी पिस्तुल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे
४ तरुण मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून ये जा करत होते. यावेळी त्यांना हटकले. त्याचा राग आरोपींना आला त्यातून त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला
ज्या दिवशी मुसळधार पाऊस होईल तेव्हा कोथरूडमध्ये कोठेही पाणी तुंबू देऊ नका. पाणी वाहून गेले पाहिजे याकडे लक्ष द्या असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले
पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी कोथरूड मतदारसंघात एक समन्वय अधिकारी नेमावा, अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली
चंद्रकांत पाटील यांनी घेतला कोथरूड मतदारसंघातील पावसाळापूर्व कामांचा आढावा
शहरात एकूण २०१ मुख्य नाले असून त्यापैकी १५ नाले हे कोथरूड मतदारसंघातून वाहतात
या नाल्यांची सफाई ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील, पालिकेची माहिती
- गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शिरापूर येथील गायकवाड यांचा गायांचा गोठा ढासळला
- तानुबाई मारुती गायकवाड असे वय वृद्ध महिलेचे नाव
- तानुबाई गायकवाड ह्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या.
- शेतात भावाचा मुलगा दिग्विजय ताकमोगे यांनी शेतात गेल्यानंतर गोठा कोसळल्याचे पाहिलं,त्यानंतर पडलेल्या गोठ्याखाली तानुबाई गायकवाड दिसून आल्या.
- मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल.
लातूर जिल्ह्यात मागच्या दहा दिवसापासून सलग अवकाळी पाऊस होतो आहे...
त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे...
मुसळधार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे..
आंबा ज्वारी बाजरी, कांदा या शेती पिकांचं मोठं नुकसान झाला आहे...
तर शिरूर अनंतपाळ शिवारातील राजकुमार शिवणे या शेतकऱ्याच्या तीन एकर क्षेत्रावरील कांदा अवकाळी पावसामुळे पाण्यात गेला आहे...
काढणीला आलेल्या कांद्या, मात्र सतत पाऊस असल्याने कांदा नासाडीला सुरुवात झाली आहे...
पालघरच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस. पाऊस दिवसभर असाच सुरू राहिला तर सकल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होण्याची स्थिती. आज पालघर मध्ये येलो अलर्ट.
नांदेड मध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नांदेड येथील रेल्वे स्थानक परिसरात ही हीच परिस्थिती पाहायला मिळते. नांदेड रेल्वे स्थानक परिसरात सर्वच बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. अनेक वयोवृद्ध प्रवाशांना पाण्यातून वाट काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे
पहाटेपासून मुंबईत पावसाला सुरुवात
मुंबईत पावसाला अलर्ट
पावसामुळे मुंबईतील वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला
यवतमाळ जिल्ह्यातील मागील तीन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी भुईमूग पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, दिग्रस,महागाव या भागातील पावसामुळे भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेंगा आणि काढून ठेवलेले भुईमूग पावसामुळे जागीच बुरशी लागली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हे पिक हातातुन गेल्याने आता पेरणी करण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकरीवर्गांना पडला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सततच्या मान्सूनपूर्व पावसाच्या पाण्यामुळे नव्याने बांधलेल्या विहिरीचे सिमेंट काँक्रीटचे कडे विहिरीमध्ये कोसळल्याची घटना नाशिकच्या निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथे घडली आहे पप्पू काशिनाथ दराडे यांनी गट नंबर 132 मध्ये अंदाजे चार लाख रुपये खर्च करत 60 फूट विहिर केली या विहिरीत तीस फूट सिमेंट काँक्रीटचे कडे बांधले होते हे कडे शनिवारी कोसळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली
पुणेकरांच्या खिशाला लागणार कात्री
PMPL ने जाहीर केलेली दरवाढ 1 जून पासून लागू होणार
1 जून पासून PMPL चे किमान तिकीट 10 रुपये असणार
या दरवाढीनंतर 30, टक्के उत्पन्न वाढण्याची अपेक्षा PMPL ला आहे
आत्ताच्या तिकिटाच्या दुप्पट पैसे देऊन पुणेकरांना 1 जून पासून प्रवास करावा लागणार आहे
मागील दरामध्ये किमान प्रवास दर 5 रुपये होता आता किमान प्रवास दर 10 रुपये आणि त्यापुढे असणार आहे
राज्यातील नऊ हजार ३७३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील नोंदणी करता येणार
यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे
या अंतर्गत ‘कॅप’ फेरीसाठी १८ लाख ७७ हजार ८३९ जागा, तर विविध कोट्यांतर्गत दोन लाख १४ हजार ५११ जागा उपलब्ध
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे
विद्यार्थ्यांसाठी नोंदणी आणि प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू
या अंतर्गत विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल १० उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ उपलब्ध
https://mahafyjcadmissions.in/
पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील दुर्दैवी घटना
विजेची तार तुटून रस्त्यावर पडल्याने घडला अपघात
पुण्यातील कसबा पेठेत तारेचा शॉक लागून मुक्या जनावराने गमावला आपला प्राण
महावितरणाचा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर?
तारेची वेळेत दुरुस्ती न केल्याने मुक्या जनावराने गमावला जीव
अकोल्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होतो आहे.. प्रादेशिक हवामान विभागाने अकोल्यात येत्या 28 मे'पर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आज 25 आणि उद्या 26 मे रोजी विजेच्या कडकडाटासह हवेचा वेग ताशी 40 किमीपेक्षा अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, दुसरीकडे पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे..
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या बैठकीवर तहसीलदारांचा बहिष्कार...
अमरावती जिल्ह्यात येऊन किरीट सोमय्या यांच्याद्वारे फौजदारी कारवाईबाबत दबाव टाकत असल्याचा तहसीलदार संघटनेचा आरोप
सोमय्या वारंवार अमरावती जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयात भेटी देऊन
अधिकारी कर्मचाऱ्यांवर जन्ममृत्यू दोन्ही संदर्भात फौजदारी कारवाईची मागणी करतात शिवाय अर्जदारावर फौजदारी कारवाई करा अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करेल अशा प्रकारे दबाव टाकत असल्याचा तहसीलदार संघटनेचा मोठा आरोप
अमरावती जिल्ह्यातील तहसीलदार संघटनेचे अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यापुढे किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला व बैठकीला उपस्थित राहणार नाही- तहसीलदार संघटनेचा मोठा निर्णय
बांगलादेशी रोहिंगे यांना खोटे जन्म -मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करीत किरीट सोमय्या येत आहे सातत्याने अमरावती जिल्ह्यात
आतापर्यंत सहा महिन्यात किरीट सोमय्या यांचे 6 पेक्षा जास्त अमरावती जिल्हा दौरे
गावात पाण्याचा टँकर येताच गुंडभर पाहण्यासाठी महिलांची मोठी गर्दी..
गेल्या अनेक वर्षांपासून खडीमल गावात महिलांचा पाण्यासाठी संघर्ष..
गावातील विहिरींनी गाठला तळ विहिरीतून पाणी येते गढूळ..
टँकर वाढवून देण्याची गावकऱ्यांची मागणी.....
गेल्या कित्येक वर्षांपासून खडीमल येथील गावकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष
कर्जत ते पनवेल लोकल सेवा दीड वर्षांमध्ये प्रवाशांसाठी धावेल तसेच तसेच जवळपास 70 टक्के काम कर्जत पनवेल काम झालेलं आहे
तसेच येत्या कालावधीमध्ये 30 टक्के राहिलेलं काम सुद्धा पूर्ण केलं जाणार आहे
सिडकोच्या हद्दीतील 27 रेल्वे स्टेशन हे सिडकोकडून बांधलेले आहेत आणि सिडको त्याची देखभाल करत आहे
मात्र अनेक प्रवाशांच्या अडचणी पार्किंगच्या होत असताना त्यामुळे ही सर्व रेल्वे स्टेशन सिडकोची देखभाल काढली जाणार असून रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरण केली जाणार आहेत
याच मागणीसाठी या आठवड्यामध्ये बैठक होणार आहेत त्यामध्ये निर्णय घेतला जाणार आहे ते सिडको सुद्धा मान्य केला आहे
मुरूड जवळील समुद्रात असलेला जंजिरा किल्ला उद्या म्हणजे 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे.
मेरीटाइम बोर्ड आणि पुरातत्व विभागाला तसे आदेश मिळाले आहेत.
मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळायला सुरुवात होते. लाटांच्या माऱ्यामुळे शिडाच्या होड्याना अपघात होण्याची शक्यता असते.
पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा युवासेना मोर्चे बांधणी करायला सुरुवात झाली त्यानिमित्ताने
नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून 'युवासेना-आपल्या दारी' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
स्थानिक नागरिकांच्या आणि युवकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यात आला.
या पुढाकाराच्या माध्यमातून नवी मुंबईतील विविध प्रभागांमध्ये चौकसभांद्वारे संवाद साधला जात आहे
युवा सेनेच्या जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात शुभारंभ करण्यात आला आहे
मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे बाजरी. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल बाजरी पीक शेतात जमीनदोस्त झाले.
थोडेफार शिल्लक राहिलेले पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मावळच्या अनेक गावांमधून रब्बी हंगामातील उन्हाळी बाजरी पिकाची लागवड केली जाते.
सध्या या बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. मजुरांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेर गावावरून मजूर बोलावले आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी बाजरी काढून ठेवली आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून वातावरण बदलामुळे पाऊस दररोज पडत आहे.
त्यामुळे पीक काढणीला अडचण येत आहे.
बाजरीचे पीक आडवे झाल्याने आता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.