Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ टेम्पोने दुचाकीला चिरडलं, महिलेचा मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

Pune Accident News: पुण्यातील नवले पुलाजवळ अपघाताची मालिका सुरूच आहे. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाला तर तिची मुलगी गंभीर जखमी झाली.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघाताची घडना घडली. भरधाव टेम्पोने दुचाकीला चिरडले. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू तर आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला होता पण पोलिसांनी काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या. या अपघाताचा तपास आंबेगाव पोलिस करत आहेत. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पुण्यात कात्रज-नवले पूल रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डायव्हर्जनच्या ठिकाणी दुचाकीला टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. लहुबाई अश्रुबा वाघमारे (४९ वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. लहुबाई या आंबेगाव खुर्दमधील वाघजाईनगरमध्ये राहत होत्या. तर दुचाकी चालवत असलेल्या प्रियांका राऊत (३३ वर्षे) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी टेम्पोचालक नीलेश महादेव नांदगुडे (३८ वर्षे) या टेम्पो चालकाला अटक केली. टेम्पो चालक पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये राहणारा आहे. अपघाताची ही घटना रविवारी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी वंडरसिटीजवळ घडली आहे. लहुबाई आणि त्यांची मुलगी प्रियांका दुचाकीवरून महात्मा फुले मंडईकडे जात होत्या. त्याच वेळी कात्रजकडून नवले पुलाकडे जाणाऱ्या टेम्पो चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात लहूबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर प्रियांका यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. आंबेगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT