Karnala Ghat Accident : कर्नाळा घाटात खासगी बस उलटली, भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू, १९ जखमी

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा घाटात खासगी बस उलटली. या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू, तर १९ जण जखमी झाले आहेत. प्रवासी बस पनवेलवरून रायगडला जात होती.
Mumbai-Goa Highway Karnala Gha Accident
Karnala Ghat on the Mumbai-Goa Highway as a private bus carrying 35 passengers overturned, killing 3 and injuring 19.Saam TV News
Published On

Mumbai Goa Highway Karnala Ghat Accident : पनवेलहून रायगडला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा अभयारण्य मधील घाटात खासगी बस उलटली. ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बसचा रविवारी रात्री ११ वाजता भीषण अपघात झाला. घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस घाटात उलटली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झालाय. १९ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर पनवेलमधील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात एका चिमुकलीचा हात कापला गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघात जखमी झालेल्यांवर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येतेय, तर काहींची प्रकृती गंभीर आहे.

कर्नाळा अभयारण्यमधील घाटात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बस अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी आहेत. ओमकार ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाला. घाटात तीव्र वळण असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथणिक माहिती समोर आली आहे. बस उटल्याचे कळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात जखमी झालेल्यांना कामोठे येथील एमजीएम रूग्णालसात उपचारांसाठी भर्ती करण्यात आले आहे.

Mumbai-Goa Highway Karnala Gha Accident
HSC Result 2025: ऑल द बेस्ट! आज जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे पाहाल रिझल्ट?

ओमकार ट्रॅव्हल्स ची ही खासगी बस मुंबईहून कोकणात प्रवासी घेऊन जात होती. कर्नाळा जवळ बस उलटल्याने अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले. अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू असल्याने दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. या बसमध्ये ३५ पेक्षा अधिक प्रवासी होते, त्यामधील १९ जण जखमी झाले आहेत. ३ जणांचा मृत्यू झालाय. त्यामधील एकाचे नाव अमोल तलवलेकर (वय अंदाजे ३०-३२ वर्षे)असे आहे. तर एका लहान मुलीचा पाय पत्र्याने कापला गेला असून तिच्या वर एमजीएम रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे.

Mumbai-Goa Highway Karnala Gha Accident
Vande Bharat : वंदे भारत नागपूरहून मुंबईसाठी धावणार, कुठे कुठे थांबणार? तिकीट किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com