Vande Bharat : वंदे भारत नागपूरहून मुंबईसाठी धावणार, कुठे कुठे थांबणार? तिकीट किती?

Nagpur to Mumbai Vande Bharat : नागपूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ८३७ किमीचा प्रवास केवळ ९ तासांत करणार. थांबे, तिकीट दर, वेळापत्रक आणि बोगी रचना याची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.
Nagpur to Mumbai Vande Bharat
Nagpur to Mumbai Vande Bharat Saam Tv
Published On

Nagpur to Mumbai Vande Bharat Express Train: भारतामध्ये सध्याच्या घडीला तबब्ल १३६ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. त्यामध्ये आणखी भर पडणार आहे. कारण, रेल्वेचे जाळं मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेकडून आणखी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express train) सुरू करण्यात येणार आहेत. चेन्नई येथील रेल्वे फॅक्टरीमध्ये नव्या बोगींची निर्मिती केली जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवास वेगवान आणि आरामदायी होत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे देशातील दोन मोठ्या शहरांना जोडले जात आहे. लवकरच नागपूर ते मुंबई (Nagpur To Mumbai ) या दोन शहरादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. या मार्गावर ट्रेनची संख्या आणि प्रवाशांची वाढती गर्दी पाहून रेल्वेकडून वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

मुंबई ते नागपूर यादरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारतचे तिकिट किती असेल? बोगी किती असतील? नागपूर ते मुंबई या प्रवासावेशी ट्रेन कोण कोणत्या स्टेशनला थांबणार? आठवड्यातून कितीवेळा ट्रेन धावणार? नागपूर ते मुंबई या प्रवासाला किती वेळ लागणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

नागपूर ते मुंबई किती वेळ लागणार? Nagpur to Mumbai Vande Bharat Express Route, Distance, Travel Time

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. ८३७ किमीचा नागपूर-मुंबई प्रवास वंदे भारत एक्सप्रेस (Nagpur to Mumbai Vande Bharat Express train) फक्त ९ तासांत पूर्ण करणार आहे. म्हणजेच, प्रवासाचा वेळ पाच ते सहा तास वाचणार आहे. इतर रेल्वेंना मुंबई ते नागपूर या प्रवासासाठी १४ ते २० तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेसमुळे ६ ते ९ तासांचा वेळ वाचणार आहे. त्याशिवाय आरामदायी प्रवास करता येणार आहे.

Nagpur to Mumbai Vande Bharat
Pune : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर, तिकीट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

नागपूर ते मुंबई, वंदे भारत ट्रेन कुठे कुठे थांबणार ? Nagpur to Mumbai Vande Bharat Train Stoppages

नागपूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. १६० किमी प्रतितास वेगाने धावणारी वंदे भारत सीएसएमटी ते नागपूर या प्रवासादरम्यान ८ स्थानकावर थांबेल. यामध्ये वर्धा, भंडारा, अकोला, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण आणि दादर या स्थानकावर वंदे भारत थांबणार आहे. काही दिवसांतच नागपूर ते मुंबई या रेल्वे मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनही धावण्याची शक्यता आहे.

Nagpur to Mumbai Vande Bharat
Vande Bharat Sleeper : नागपूर-पुणे फक्त ३ तासांत, लवकर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

मुंबई ते नागपूर तिकीट किती असेल? बोगीची संख्या काय असेल? Nagpur to Mumbai Vande Bharat Express Ticket Price

मुंबई ते नागपूर यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ८ बोगी असतील. यामध्ये एक बोगी Executive AC असेल तर सात बोगी या एसी Chair Car असतील. यामार्गावर प्रवासाला ९ ते १० तास लागतील. मुंबई ते नागपूर यादरम्यान AC Chair Car चे तिकिट अंदाजे १५०० ते २००० रूपये इतके असेल. तर Executive AC बोगीचे तिकिट २५०० ते ३५०० रूपये इतके आहे. तिकिटाच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Nagpur to Mumbai Vande Bharat
Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेन धावणार, तिकीट किती? कुठे थांबणार?

मुंबई ते नागपूर, कधी अन कोणत्या वेळेला धावणार वंदे भारत ? Nagpur to Mumbai Vande Bharat Express Train Timing, Time Table

वंदे भारत ट्रेन पहाटे ५ वाजता नागपूर स्थनकापासून निघेल. ९ तासांच्या प्रवासानंतर ट्रेन दुपारी दोन वाजता सीएसएमटी स्थनकावर पोहचेल. सीएसएमटी स्थनकातानू ट्रेन दुपारी तीन वाजता निघेल. ही ट्रेन रात्री २३.५० वाजता नागपूरमध्ये ही ट्रेन पोहचेल.

Nagpur to Mumbai Vande Bharat
Pune : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर, तिकीट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com