Nagpur Horrific Road Accident on Kalmeshwar Road 3 Killed : नागपूरच्या नवीन कटोल नाका टोल प्लाझाजवळ कालमेश्वर रोडवर स्कुटी, ट्रक आणि मिनी टेम्पोचा भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघात इतका भयंकर होता की टेम्पोचा चक्काचूर झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदत केली. जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळा धाव घेत पंचनामा केला अन् वाहतूक कोंडी सुरळीत केली.
प्राथमिक माहितीनुसार, कालमेश्वरहून नागपूरकडे जाणारी स्कूटी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. यानंतर मिनी ट्रक आणि नवीन कटोल नाक्याकडून येणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कूटीवरील दोन आणि मिनी ट्रकमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातातील मृतांची नावे रोशन टेकाम, रमेश देहनकर आणि रामकृष्ण मसराम अशी आहेत. अपघात झालेले मालवाहू चार चाकीवाहन रविवारी संध्याकाळी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी उपज पोहोचून परत काटोलच्या दिशेने जात होते. एका वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, अन् समोरून येणाऱ्या ट्रकला धडकले.
अपघात इतका भीषण होता की घटनेच्या वेळेला त्या ठिकाणातून जात असलेल्या काही दुचाकी चालकांनाही झळ बसली. दुचाकी चालकही जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टेम्पोचा वेग जास्त होता, ज्यामुळे स्कूटीवरील नियंत्रण सुटले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.