Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

Pune News: पुण्याच्या महंमदवाडी येथे भीषण अपघात झाला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाला.

Priya More
  • पुण्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक

  • महंमदवाडीत ही अपघाताची घटना घडली

  • आयटी इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

  • डंपरच्या चाकाखाली चिरडून या तरुणाचा मृत्यू

सचिन जाधव, पुणे

पुण्यात भीषण रस्ते अपघातामध्ये आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपरच्या चाकाखाली चिरडून दोन जण गंभीर झाले. यामधील आयटी इंजिनिअर असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पुण्याच्या महंमदवाडी येथे घडली. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, महंमदवाडी येथील रेहेजा विस्टा परिसरात डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आयटी इंजिनिअरचा तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला. २१ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. हमजा इब्राहिम सरकार (वय २० वर्षे) असे मृत तरुणाचे नाव होते. तर केस वसीम खान (वय २० वर्षे) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला डंपर आणि चालक भागण्णा लक्ष्मण कटबू (वय ३४) याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. हमजा आणि वसीम हे दुचाकीवरून रेहेजा विस्टा परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. धडकेनंतर दुचाकी डंपरच्या मागील चाकाखाली गेली. या अपघातात अंगावर डंपरचे चाक गेल्यामुळे आयटी इंजिनिअर हमजाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी रस्तारोको आंदोलन केले.

दरम्यान आज पुणे - सातारा महामार्गावर भीषण अपघात झाला. धांगवडी हद्दीत कारने महामार्गावरून वळण्यासाठी अचानक टर्न घेतला. त्यामुळे पाठीमागून येणारी दुचाकी त्याच्यावर धडकली. या अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणी जखमी झाले. भरधाव कारने बेपरवाईपणे अचानक सर्विस रस्त्यावर जाण्यासाठी वळण घेतल्याने दुचाकीस्वाराला कारची थेट धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान हा सर्व प्रकार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Ovache Pani Pinyache Fayde: 15 दिवस रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्या, वजन होईल झटपट कमी

Camphor : फक्त पूजेसाठीच नाही! ५-१० रुपयांचा कापूर आरोग्याच्या 'या' ७ समस्यांवर रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT