पुण्याजवळील खेड शिवापूर टोलनाक्यावर भीषण अपघात
भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने नवरा-बायकोचा मृत्यू
दोघेही टँकरच्या चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच मृत्यू झाला
दोघेही पुण्यातील पर्वती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती
पुण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. टँकरच्या चाकाखाली नवरा बायको चिरडले गेले. पुणे- सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याजवळील खेड शिवापूर टोलनाक्यावर दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरून जाणारे नवरा-बायको रस्त्यावर पडले. त्यानंतर टँकरच्या चाकाखाली चिरडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला. मृत्यू झालेले दोघेही पुण्यातील पर्वती परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला टँकरने चिरडलं. या अपघातामध्ये राजेंद्र बबन मोरे आणि सविता राजेंद्र मोरे या दोघांचा मृत्यू झाला. ते दोघेही पुण्यातील वारजे माळवाडी येथे राहणारे होते. दोघांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच खेडशिवापूरच्या राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, धुळ्यामध्ये पेट्रोलचा टँकर पलटल्याने मोठा अपघात झाला. साक्री तालुक्यातील दहिवेल पिंपळनेर मार्गावर रस्त्याच्या मधोमध पेट्रोलचा टँकर उलटला. अपघातानंतर संधी साधू नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून नेले. अपघातात टँकरमधून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची गळती झाली. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पेट्रोल टंचाईच्या काळात टँकर पलटी झाल्यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच चंगळ झाल्याची चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.