Mumbai-Pune Tourism : फुल टू धमाल! मुंबई-पुण्याजवळील ५ Hidden हिल स्टेशन्स, निसर्ग सौंदर्य पाहताच महाबळेश्वर-माथेरान विसरून जाल

Shreya Maskar

जव्हार

जव्हार हिल स्टेशन मुंबईपासून अंदाजे १३० किमी अंतरावर आहे. जव्हार हे 'ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. येथे धबधबे पाहायला मिळतात.

Jawhar | google

मोखाडा

जव्हारजवळ मोखाडा हे हिल स्टेशन आहे. मोखाडा हे पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले एक शांत आणि निवांत ठिकाण आहे. हिरवीगार शेतशिवारामुळे उन्हाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.

Mokhada | google

सूर्यमाळ

इगतपुरीपासून अंदाजे ८५ किमी अंतरावर सूर्यमाळ हे हिल स्टेशन आहे. शांत आणि प्रसन्न पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सूर्यमाळ हिल स्टेशनच्या सभोवताली टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. येथे भन्नाट फोटोशूट करा.

Suryamal | google

भंडारदरा

भंडारदरा हे हिल स्टेशन मुंबईपासून अंदाजे १६५ किमी अंतरावर आहे. इगतपुरीच्या जवळ वसलेल्या या ठिकाणी भंडारदरा धरण, आर्थर तलाव आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेला नयनरम्य कळसुबाई शिखर पाहायला मिळतो.

Bhandardara | google

आंबोली

आंबोली हे मुंबईपासून अंदाजे ५०० किमी अंतरावर आहे. दक्षिण सह्याद्रीच्या रांगेत वसलेले आंबोली हे ठिकाण येथील धुक्याने आच्छादलेली जंगले, भरपूर पर्जन्यमान आणि जैवविविधतेसाठी ओळखले जाते.

Amboli | google

माळशेज घाट

माळशेज घाट मुंबईपासून अंदाजे १२५ किमी अंतरावर आहे. हा एक अतिशय सुंदर घाटमार्ग असून, येथे असंख्य धबधबे, विविध प्रकारची वनसंपदा आणि प्राणीसृष्टी पाहायला मिळते. हे ठिकाण गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Malshej Ghat | google

पन्हाळा

पन्हाळा हिल स्टेशन कोल्हापूरजवळ आहे. विहंगम दृश्यांनी नटलेले हे एक ऐतिहासिक शहर आहे. येथे इतिहास, ट्रेकिंग आणि शांतता (एकांत) यांचा सुरेख संगम अनुभवता येतो. तसेच येथे ऐतिहासिक 'अंधार बावडी' (लपलेली विहीर) देखील पाहता येते.

Panhala | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Mumbai-Pune | google

NEXT : समुद्राच्या कुशीत वसलेला अजिंक्य किल्ला; मराठा, इंग्रज अन् पोर्तुगीजांनाही जिंकता आला नाही

Fort In Maharashtra | pinterest
येथे क्लिक करा...