Fort In Maharashtra : समुद्राच्या कुशीत वसलेला अजिंक्य किल्ला; मराठा, इंग्रज अन् पोर्तुगीजांनाही जिंकता आला नाही

Shreya Maskar

मुरुड-जंजिरा किल्ला

मुरुड-जंजिरा किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील १७ व्या शतकातील एक सागरी दुर्ग आहे. तुम्ही येथे उन्हाळ्यात वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Murud-Janjira Fort | pinterest

अजिंक्य किल्ला

मुरुड-जंजिरा हा भारतातील एकमेव 'अजिंक्य' किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत पर्यटकांसाठी खुला असतो.

An Unconquered Fort | pinterest

किल्ला कधी बांधला?

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला आहे. सिद्दी जोहरने १७ व्या शतकात या बेटावर अभेद्य तटबंदी बांधली.

fort | pinterest

मजबूत तटबंदी

मुरुड-जंजिरा किल्ल्यावरील तटबंदी अनेक प्रयत्न करूनही मराठे, पोर्तुगीज किंवा ब्रिटीश जिंकू शकले नाहीत. या किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.

Fortifications | pinterest

तीन बलाढ्य तोफा

मुरुड-जंजिरा किल्ला हा प्रचंड तटबंदी, तीन बलाढ्य तोफांसाठी (कलालबंगडी, चावरी, लांडा कासम) आणि पूर्वेकडील एका गुप्त दरवाजासाठी ओळखला जातो.

Three Mighty Cannons | pinterest

गोड्या पाण्याचे तलाव

चहुबाजूंनी खारे पाणी असतानाही, मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या आत दोन नैसर्गिक गोड्या पाण्याचे तलाव आहेत.

Tanks | pinterest

उंची किती?

मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या भिंतींची उंची साधारणपणे ४० फूट (सुमारे १२ मीटर) आहे. अरबी समुद्रात वसलेला, १७ व्या शतकातील आणि २२ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा द्वीप-किल्ला १९ भक्कम बुरुज, अभेद्य तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे.

Height | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

disclaimer | pinterest

NEXT : मुंबईहून फेरीने सहज पोहचा ‘या’ सुंदर ठिकाणी, उन्हाळ्यात वॉटर स्पोर्ट्सचा घ्या आनंद

Mumbai Tourism | saam tv
येथे क्लिक करा...