Mumbai Tourism : मुंबईहून फेरीने सहज पोहचा ‘या’ सुंदर ठिकाणी, उन्हाळ्यात वॉटर स्पोर्ट्सचा घ्या आनंद

Shreya Maskar

अलिबाग

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मांडवा बीच वसलेला आहे. मुंबईजवळचे हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. शहराच्या गर्दीतून तुम्ही येथे काही वेळ विश्रांती घेऊ शकता.

Alibaug | yandex

मांडवा बीच

मांडवा बीच जलक्रीडा, नयनरम्य सूर्यास्तासाठी ओळखला जातो. मांडवा बीच हा वालुकामय किनारा आहे. आजूबाजूला आधुनिक कॅफे आणि ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात.

Mandwa Beach | yandex

जलक्रीडा स्थळ

मांडवा बीचला गेल्यावर जेट-स्कीइंग, कयाकिंग, बनाना बोट राईड आणि पॅरासेलिंग यांसारख्या जलक्रीडांचा आनंद घेता येतो. वीकेंडला येथे गर्दी पाहायला मिळते.

Water Sports | yandex

कसं जाल?

सर्वात सोपा मार्ग म्हणजे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून मांडवा जेट्टीपर्यंत फेरीने जा. तुम्हाला एक सुंदर अनुभव मिळेल.

How ​​to Get There | yandex

सी-फूड

मांडवा बीचला गेल्यावर ताजे सी-फूड खायला मिळते. मांडवा बीच जवळ किहीम किनारा आहे. येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.

Seafood | yandex

ऐतिहासिक ठिकाणे

मांडवा बीचजवळील ऐतिहासिक ठिकाणांमध्ये प्रामुख्याने खांदेरी-उंदेरी किल्ले, कुलाबा किल्ला, हिराकोट तलाव आणि किल्ला यांचा समावेश आहे.

Historical Sites | yandex

कॅम्पिंगचा आनंद

मांडवा बीचजवळ तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. वीकेंडला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Camping | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Mumbai Tourism | yandex

NEXT : सात डोंगरांनी वेढलेले 'हे' ठिकाण जणू महाराष्ट्रातील स्वर्गच, हनिमूनसाठी रोमँटिक डेस्टिनेशन

Satara Tourism | yandex
येथे क्लिक करा...