Accident News : ५ मित्रांचा बर्थडे पार्टीचा प्लान, घराकडे परत येताना काळचा घाला; बर्थ डे बॉयसह ३ मित्रांचा करुण अंत

Solapur-Hyderabad Highway Car Accident News : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर पर्ल गार्डनजवळ भीषण कार अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या मित्रांच्या कारची टेम्पोला धडक बसल्यानंतर कार १५० फूट फरफटली.
SOLAPUR-HYDERABAD HIGHWAY ACCIDENT: THREE FRIENDS KILLED AFTER BIRTHDAY PARTY
SOLAPUR-HYDERABAD HIGHWAY ACCIDENT: THREE FRIENDS KILLED AFTER BIRTHDAY PARTYSaam Tv
Published On
Summary
  • सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू.

  • वाढदिवसाची पार्टी करून परतताना मित्रांच्या कारची टेम्पोला धडक

  • कार तब्बल १५० फूट फरफटत जाऊन दुभाजकावर आदळली

  • जोडभावी पेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वाढदिवसाची पार्टी करून घरी परतणाऱ्या मित्रांच्या कारचा पर्ल गार्डनजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत अमोल श्रीशैल येरटे, शेखर सुरेकर आणि कादर सैदु हंडे या तिघांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील शांती चौक परिसरातील सुझुकी शोरूममध्ये अमोल येरटे (वय ४०), शेखर सुरेकर (वय ३३), कादर हंडे (वय ३४), स्वरूप कोथिंबिरे आणि जाधव हे पाच मित्र एकत्र काम करत होते. कादर हंडे याचा वाढदिवस असल्याने सर्व मित्रांनी देगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. रात्री उशिरापर्यंत वाढदिवस साजरा करून हे सर्वजण कारने घरी निघाले होते.

SOLAPUR-HYDERABAD HIGHWAY ACCIDENT: THREE FRIENDS KILLED AFTER BIRTHDAY PARTY
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

पहाटे दीडच्या सुमारास त्यांची कार सोलापूर-हैदराबाद रोडवरील पर्ल गार्डन परिसरात पोहोचली. त्यावेळी महामार्गावर एका टेम्पोचा गिअर बॉक्स बिघडल्याने तो रस्त्यावर थांबला होता. अचानक समोर टेम्पो दिसल्याने चालक अमोल येरटे यांनी कार वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने कार प्रथम टेम्पोला धडकली आणि त्यानंतर तब्बल १५० फूट फरफटत जाऊन दुभाजकावर आदळली.

SOLAPUR-HYDERABAD HIGHWAY ACCIDENT: THREE FRIENDS KILLED AFTER BIRTHDAY PARTY
Shocking : २१ वर्षाच्या तरूणीला बॉयफ्रेंडने जिवंत जाळले, कुटुंबियांनीही केली मदत, कारण वाचून थरकाप उडेल

अपघात इतका भीषण होता की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अमोल येरटे आणि शेखर सुरेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या कादर हंडे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. कारमधील एअरबॅग उघडल्या होत्या, तरी अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की त्याचा उपयोग झाला नाही.

SOLAPUR-HYDERABAD HIGHWAY ACCIDENT: THREE FRIENDS KILLED AFTER BIRTHDAY PARTY
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

या घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पहाटे उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेमुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास जोडभावी पेठ पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com