prithviraj chavan demands to publish magasvargiya aayog ahwal on website
prithviraj chavan demands to publish magasvargiya aayog ahwal on website  Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation : पृथ्वीराज चव्हाण सरकारवर भडकले, जरांगेंच्या जीवाला धोका झाला तर जबाबदार कोण? आत्ताच्या आत्ता...

दिलीप कांबळे

Congress Rajyastariya Prashikshan Shibhir :

महाराष्ट्र सरकराने आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेला पाहू द्या. हा अहवाल विधीमंडळात ठेवण्याची आवश्यकता नाही विधीमंडळापेक्षा राज्यातील जनता सर्वाेच्च आहे असे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan latest marathi news) यांनी नमूद केले. (Maharashtra News)

लोणावळा (lonavala) येथे महाराष्ट्र काॅंग्रेसचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयाेजित करण्यात आले आहे. यापूर्वी काॅंग्रेस नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जरांगेंचे नवी मुंबईत उपोषण सोडलं गेलं. गुलाल उधळला गेला. प्रश्न सुटला गेले असे सांगितले गेले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले ते सांगावं. मराठा आरक्षणाची स्पष्टता झाली पाहिजे. आज पुन्हा ते उपाेषणास बसले आहेत. याचा अर्थ सरकारकडून त्यांची फसवणुक झाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण पुढे बाेलताना म्हणाले आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करा. हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेला पाहू दे. सरकराने 2 तासांत अध्यादेश काढला पाहिजे. त्यासाठी अधिवेशनाची गरज नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे यांची तब्येत खराब आहे. ताबडताेब मार्ग काढा. जरांगेंच्या जीविताला धोका झाला तर जबाबदार कोण ? असा सवाल आमदार चव्हाण यांनी उपस्थित केला. यावेळी काॅंग्रेस नेते नाना पटाेले (nana patole), सुशिलकुमार शिंदे (sushilkumar shinde) आदी उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Supplement : प्रोटीन सप्लिमेंट आरोग्यासाठी घातक?; प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी विकार?

Tabu : उतरत्या वयातही तबूच्या सौंदर्याची जादू

Nashik Land Scam: नाशकात भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं? 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा थेट मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेचा महायुतीला जाहीर पाठिंबा

Divorce over Kurkure: कुरकुऱ्यांमुळं संसारात किरकिर वाढली; बायको रुसली, पोलीस ठाण्यात बसली, म्हणतेय घटस्फोट हवाय!

SCROLL FOR NEXT