- अक्षय गवळी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी (mla nitin deshmukh) आजपासून अकोला जिल्ह्यात शेतकरी संघर्ष पदयात्रा सुरू केली आहे. 17 दिवसांत ही पदयात्रा जिल्ह्यातील सातही तालुक्यांत जाणार आहे. दरम्यान अशोक चव्हाणांना पक्षप्रवेशानंतर लगेच भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली. दुस-याच्या भरवशावर मोदींची गॅरंटी कशी? असा सवाल आमदार नितीन देशमुख यांनी केला. (Maharashtra News)
मुर्तिजापूर तालुक्यातील गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या दापुरा गावातून तापत्या उन्हात आज आमदार नितीन देशमुख यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली. शेतकरी, कार्यकर्ते, नागरिक अणि महिला यांच्यासोबतच भजनी मंडळाचा भगव्या पथाकांसह या यात्रेत सहभागी झालेत.
ही यात्रा 300 गावांतून जवळपास 400 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार तर सोयाबीनला 10 हजार भाव देण्याची मागणी आमदार नितीन देशमुखांनी या यात्रेच्या माध्यमातून केली आहे. या यात्रेचा दररोज गावांतच शेतक-यांच्या बांधावर मुक्काम असणार आहे. दरम्यान 21 फेब्रूवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पदयात्रेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2 मार्चला अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातील भाजपचा गड असलेल्या अकोट, मूर्तिजापुर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदार संघातून ही पदयात्रा जाणार आहे. या पदयात्रादरम्यान देशमुख हे शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहे.
साम टीव्हीशी बाेलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले फोडाफोडीच राजकारण करणाऱ्यांना एकच सांगतो स्वत: मूल जन्माला आणू शकत नाही म्हणून दुसऱ्याच्या हातात मूल जन्माला आणल जातंय, हाच प्रकार भाजप करत आहे. यावेळी देशमुख यांनी राज्य सरकारसह मोदी सरकारवर देखील चांगलेच ताशेरे ओढले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अशा आहेत मागण्या
कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार भाव द्या.
सोयाबीनला 10 हजार भाव द्या.
दोन्ही पीकं विकलेल्या शेतक-यांना प्रतिक्विंटल 3 हजार अनुदान द्या.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.