Ambadas Danve Video : जनता दरबारातून अंबादास दानवेंचा पोलिस अधीक्षकांना फाेन, सुनावले खडेबोल (पाहा व्हिडिओ)

त्यांचं स्टेटमेंट घ्या आणि गुन्हा रजिस्टर करा, कारवाई करा, काय करायचे ते करा एनसी घ्या, गुन्हा दाखल करा किंवा एफआयआर करा असे अंबादास दानवेंनी एसपी महेंद्र पंडितांना सांगितले.
ambadas danve
ambadas danvesaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

एका कुटुंबास मारहाण प्रकरणी पाेलिस दखल घेतल नसल्याने संबंधित कुटुंबाने आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve latest marathi news) यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. या कुटुंबाने मांडलेल्या कैफियतीननंतर दानवेंनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित (mahendra pandit) यांना फाेन करुन फैलावर घेतले. तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (rajesh kshirsagar) आणि पाेलिसांची मस्ती चालणार नाही असे बजावले. दानवे यांचा संवादाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे. (Maharashtra News)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जनता दरबार उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम विविध जिल्ह्यात राबविला जात आहे. आज (गुरुवार) "जनाधिकार जनता दरबार" निमित्त अंबादास दानवे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहा येथील छत्रपती शाहू सभागृहात जनता दरबार सुरु करण्यापूर्वी दानवे यांनी करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. दानवे यांनी आयाेजिलेल्या जनता दरबारास काेल्हापूर व परिसरातील नागरिक माेठ्या संख्येने जमले आहेत.

यावेळी दानवे यांच्या समाेर एकाने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याची तक्रार मांडली. त्यावेळी अंबादास दानवे यांनी तक्रारदारास तुम्ही खरे सांगत आहात का असा प्रतिप्रश्न केला. तक्रादाराने हाे म्हणताच दानवेंनी पोलीस प्रमुखांना फाेन लावा अशी सूचना केली.

त्यानंतर फाेनवर दानवेंनी एसपी पंडीत यांची खरडपट्टी केली. दानवे म्हणाले पोलीस अधिकारी तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेत नाहीत. नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण आहेत हे.. यांनी त्यांना मारहाण केली. त्यांचा फ्लॅट बाळकावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लोक त्याला संरक्षण देताय का, गुन्हा का दाखल नाही त्याच्यावर ? असा जाब दानवेंनी एसपी पंडीत यांनी विचारला.

ambadas danve
Satara Lok sabha Constituency : उदयनराजे भाेसले- जयकुमार गाेरेंच्या मैत्रीत लाेकसभा निवडणुक ठरणार मिठाचा खडा? चर्चांना उधाण

मी आता त्यांना तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन येत आहे, तुम्ही कुठे आहात ? आता ताबडतोब अधिकारी पाठवायचा आणि त्यांचं स्टेटमेंट देतो आणि कारवाई झाली पाहिजे सांगून ठेवतो असे दानवेंनी म्हटले. यावेळी दानवेंनी मस्ती झाली नाही पाहिजे, पोलिसांची आणि क्षीरसागरची सांगून ठेवतो. समजलं का असा दमही एसपी पंडीत यांना दानवेंना भरला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले त्यांचं स्टेटमेंट घ्या आणि गुन्हा रजिस्टर करा, कारवाई करा, काय करायचे ते करा एनसी घ्या, गुन्हा दाखल करा किंवा एफआयआर करा असे दानवेंनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

ambadas danve
Satara : सातारा जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपासून राजधानी महा संस्कृती महोत्सवाची मेजवानी, जाणून घ्या कार्यक्रम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com