Satara Lok sabha Constituency : उदयनराजे भाेसले- जयकुमार गाेरेंच्या मैत्रीत लाेकसभा निवडणुक ठरणार मिठाचा खडा? चर्चांना उधाण

Udayanraje Bhosale Latest Marathi News : खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार जयकुमार गाेरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आमदार गाेरेंच्या वक्तव्यानंतर भाजपात खळबळ उडाली.
jaykumar gore insists atul bhosale for satara lok sabha constituency udayanraje bhosale
jaykumar gore insists atul bhosale for satara lok sabha constituency udayanraje bhosalesaam tv

Karad News :

सातारा लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांना अडचणीत आणणारी इच्छा भाजप आमदार जयकुमार गोरे (mla jaykumar gore) यांनी कराड वाठार येथील कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ (satara lok sabha constituency) डाॅ. अतुल भोसले (dr. atul bhosale) यांनी लढावं आणि खासदार व्हावं असे म्हटले आहे. यामुळे आता लोकसभेच्या तयारीला लागलेल्या उदयनराजेंना भाजपाकडून पर्याय दिला जातोय का अशी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra News)

वाठर (ता. कराड दक्षिण) येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांच्या हस्ते नुकतेच विविध विकास कामांच्या भूमिपूजन झाले. या समारंभास भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम, कराड दक्षिणचे युवा नेते डाॅ. अतुल भोसले, भाजप नेते सुनिल काटकर, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर आदी उपस्थित हाेते. यावेळी आमदार जयकुमार यांनी आपल्या भाषणातून डाॅ. अतुल भाेसले यांच्या कार्याचे काैतुक केले.

jaykumar gore insists atul bhosale for satara lok sabha constituency udayanraje bhosale
Yavatmal DCC Bank : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक कोटीचा दंड, आरबीआयची कारवाई

यावेळी आमदार जयकुमार गाेरे यांनी आपल्या भाषणात सातारा लोकसभा मतदारसंघातून डाॅ. अतुल भोसले यांनी लढावे अशी भावना व्यक्त केली. डाॅ. भाेसले यांनी खासदार व्हावे असेही म्हटले. आमदार जयकुमार गाेरेंनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्याने सातारा लाेकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार काेण असेल याची पुन्हा चर्चा झडू लागली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार जयकुमार गाेरे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. आमदार जयकुमार गाेरे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

jaykumar gore insists atul bhosale for satara lok sabha constituency udayanraje bhosale
Congress चे फेब्रुवारीत लाेणावळामध्ये चिंतन शिबीर, राहूल गांधी करणार मार्गदर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com