Yavatmal DCC Bank : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक कोटीचा दंड, आरबीआयची कारवाई

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी मायक्रो प्लॅनिंग सुरू केले होते.
rbi fines 1 cr to yavatmal dcc bank
rbi fines 1 cr to yavatmal dcc bank saam tv
Published On

- संजय राठोड

Yavatmal News :

रिझर्व बँकेच्या पतधोरणानुसार पर्याप्त भांडवल मर्यादा न पाळल्याने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (yavatmal dcc bank) दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता पर्यंत बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सध्या अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातून बँकेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी मायक्रो प्लॅनिंग सुरू केले होते. त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्न यशस्वी होतील अशी खात्री कर्मचाऱ्यांना होती.

rbi fines 1 cr to yavatmal dcc bank
Agriculture News : हळद तेजीत, कापसाच्या दरात घसरण

कठीण प्रसंगातून मार्ग निघत असताना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी दोन महिन्यांतच राजीनामा दिला. बँकेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून दोन महिन्यात दोन सीईओंनी राजीनामे दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली. दरम्यान देशपांडे यांच्या राजीनाम्याची बाब कर्मचाऱ्यांना पचनी पडलेली नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

rbi fines 1 cr to yavatmal dcc bank
Swabhimani Shetkari Sanghatana : कापसाची खरेदी सी.सी.आय, नाफेडने करावी : 'स्वाभिमानी'ची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com