प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
पूर्णेकर प्रकरणातील आरोपांवर मीनाक्षी शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले
शिंदेंनी थेट दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर दाखवली
ठाण्यातील ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणात ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि तिच्या नवऱ्यावर आरोप केले जात आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि अटकेची मागणी केली जात आहे. आता या प्रकरणावरून आरोप करणाऱ्या ठाकरेंवर आणि संजय राऊत यांच्यावर मिनाक्षी ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. मिनाक्षी शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणात राजकारण केलं जात असल्याचे सांगितले. 'पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेसेनेची केविलवाणी धडपड सुरु आहे. कोणताही पुरावा नसताना माझ्यावर आरोप केले जात आहे.', असं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अटक का नाही केली?, असा सवाल केला.
मिनाक्षी ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर माध्यमांसमोर येत पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'एखादी व्यक्ती मरते, ती मेल्यानंतर त्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रयत्न सुरु आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत घाणेरडं राजकरण करत आहेत. पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. एखाद्या महिलेला या प्रकरणात अडकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मेल्यावर त्यांच्या शरीराची विटंबना करण्यात आली. पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवण्यात आला होता. माझे नाव एफआयआरमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणताही पुरावा नसताना आरोप करत असतील तर त्यापेक्षा घाणेरडं राजकारण मी माझ्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पाहिले नाही.'
मिनाक्षी ठाकरे यांनी आरोप केला की, 'ऐवढेच आहे की शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना कुठेतरी अडकवण्याच्या प्रयत्न ते करत आहेत. या प्रकरणात कोणी दोषी असतील तर कारवाई करा. रागाला धरून जर कुणी कारवाई करत असेल तर ते चुकीचे आहे. ठोस पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप केले जात आहे. माझी आणि माझ्या पतीची चौकशी होणार आहे आणि त्याला मी सामोरे जाईन. ठाकरे आणि संजय राऊत राजकीय पोळी भाजत आहेत. ज्या ऑडिओ क्लिपबद्दल तुम्ही बोलत आहात ती एआय जनरेटेड आहे. त्या ऑडिओ क्लिपचा आणि पूर्णेकरांचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्याबाबत मी तक्रार केली होती. पोलिसांकडून चौकशी सुरू आहहे आणि आम्ही सहकार्य करणार आहोत. पोलिस प्रसासन योग्य कारवाई करत आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी माझे नाव पुरवणी एफआयआरमध्ये जबरदस्ती टाकायला लावले.'
यावेळी बोलताना मिनाक्षी ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत थेट आदिल्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी थेट एफआयआर कॉपी दाखवली. त्या म्हणाल्या की, 'दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावं आहेत. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव होते तर त्यांना अटक का नाही झाली? आदित्य ठाकरेंचे एफआयआरमध्ये ५ वेळा नाव असताना आदित्य ठाकरेंना अटक करा अशी मागणी संजय राऊतांनी का नाही केली? दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी पुरावे नष्ट केले. पुरावे नष्ट केले आहेत तर त्याची चौकशी करावी आणि त्यांना देखील अटक करा.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.