America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?

America Flights Ground Stop: अमेरिकेमध्ये अचानक विमानसेवा ठप्प झाली. ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही. १३,००० विमान उड्डाणांवर परिणाम झाला होता. यामागचे कारण समोर आले...
America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?
America Flights Ground StopSaam Tv
Published On: 

अमेरिकेत हवाई वाहतूक नियंत्रण संपर्क यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे लागू करण्यात आलेली विमान उड्डाण बंदी उठवण्यात आली. या तांत्रिक बिघाडामध्ये ४ तासांहून अधिक काळ थांबलेली अमेरिकेतील हवाई वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या व्यत्ययामुळे अमेरिकेतील १३,००० विमान उड्डाणांवर परिणाम झाला होता. अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी सांगितले की, नेमकं कोणत्या कारणामुळे ही समस्या उद्भवली होती याचे निदान झाले असून हवाई क्षेत्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने विमान उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील २२ एटीसी केंद्रांमधील नियंत्रण संपर्क यंत्रणेमध्ये समस्या निर्माण झाली होती. यामुळे विमानांची वाहतूक थांबवावी लागली. विमानसेवा ठप्प झाल्यामुळे अमेरिकेतील अनेक विमानतळावर हजारो प्रवासी अडकले होते.

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?
Flight lightning strike: 17 हजार फूट उंचीवर इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली; 104 प्रवाशांमध्ये खळबळ, पुढच्या भागाचं नुकसान

अमेरिकेच्या वाहतूक सचिव शॉन डफी यांनी हे देखील स्पष्टपणे सांगितले की, 'हवाई क्षेत्र पुन्हा उघडल्यानंतर सर्व उड्डाणे लगेचच पूर्ववत होणार नाहीत. यासाठी वेळ लागेल आणि ती हळूहळू पूर्ववत केली जात आहेत. यावेळी त्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.'

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?
Flight Fare Hike : विमान प्रवास महागला, दिवाळीपूर्वी तिकिटाच्या दरात ४ पटीने वाढ, प्रवासासाठी किती मोजावे लागणार?

शॉन डफी यांनी पुढे सांगितले की, 'शुक्रवारी दुपारी ३:३६ वाजता देशभरातील हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रे आणि ट्रॅकॉन्स येथील रडार आणि दळणवळण प्रणालीमध्ये बिघाड आढळून आला. यामुळे रडार डेटा आणि विमानांशी होणाऱ्या संवादात समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर देशव्यापी 'ग्राउंड स्टॉप' लागू करण्यात आला. ग्राऊंड स्टॉप म्हणजे विमानांना जमिनीवरच थांबण्याचे आदेश देण्यात आले. डफी यांनी सांगितले की, त्यावेळी ३,५०० पेक्षा जास्त विमाने हवेत होती. सर्व विमानांनी सूचनांचे पालन केले आणि सुरक्षितपणे लँडिंग केले.

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?
Flight Hijack : मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हायजॅकची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; विमानतळावर खळबळ

दरम्यान, अमेरिकेने देशभरातील विमान उड्डाणांमधील व्यत्ययामागे सायबर हल्ला किंवा एआय असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी याला दुजोरा दिला. ट्रम्प यांनी सांगितले की, सायबर हल्ला किंवा एआयमुळे हा व्यत्यय येण्याची शक्यता कमी आहे. अमेरिकी अधिकारी अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामागचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नसल्यामुळे त्याची चौकशी केली जात आहे.

America: अमेरिकेत अचानक 'ग्राउंड स्टॉप', ४ तास एकही विमानाने उड्डाण घेतलं नाही; नेमकं कारण काय?
Iran america war : युद्धादरम्यान KC-135 टँकर विमान कोसळलं; ४ क्रू मेंबर्सचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.