Flight Hijack : मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हायजॅकची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; विमानतळावर खळबळ

Kolkata Mumbai Flight Hijack Update News : कोलकाता विमानतळावर मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात हायजॅकची धमकी मिळाली. स्वच्छतागृहाच्या आरशावर धमकीचा मेसेज आढळल्यानंतर विमान आइसोलेशन बे येथे हलवण्यात आले.
Kolkata Mumbai Flight Hijack News
Kolkata Mumbai Flight Hijack News AI Image
Published On: 

पश्चिम बंगालमधील कोलकाता विमानतळावर बुधवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात हायजॅक करण्याची धमकी मिळाल्याने विमानतळावर एकच गोंधळ उडाला. विमानातील स्वच्छतागृहाच्या आरशावर धमकीचा मेसेज लिहिलेला आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच विमानाच्या वैमानिकाने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) याची माहिती दिली. त्यानंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तात्काळ कामाला लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे हे विमान मुंबईच्या दिशेने उड्डाण करण्याच्या तयारीत होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच विमानाच्या स्वच्छतागृहातील आरशावर हायजॅक करण्याबाबतचा मेसेज लिहिलेला दिसून आला. हा संदेश पाहिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैमानिकाने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क केले.

Kolkata Mumbai Flight Hijack News
Married Life Tips : पती-पत्नीमध्ये किती वयाचे अंतर असावे? यशस्वी आणि सुखी संसाराचं गणित समजून घ्या

घटनेची माहिती मिळताच विमानाला मुख्य पार्किंगपासून दूर असलेल्या आइसोलेशन बे येथे नेण्यात आले. त्यानंतर CISF जवानांसह विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. विमानाच्या आतील प्रत्येक भागाची काळजीपूर्वक झडती घेण्यात येत आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा धोकादायक बाब आढळते का, याची तपासणी सुरक्षा पथकांकडून केली जात आहे.

Kolkata Mumbai Flight Hijack News
Diabetes Diet : डायबिटीजवर रामबाण उपाय, भात-पोळीऐवजी खा 'हे' पदार्थ; रक्तातील साखर होईल झटक्यात कमी

दरम्यान, विमानाच्या आरशावर धमकीचा मेसेज कोणी लिहिला, याचा शोध घेण्याचे कामही सुरू झाले आहे. यासाठी विमानातील प्रवाशांची माहिती तपासली जात आहे. तसेच विमानतळ आणि विमानामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. या घटनेमुळे कोलकाता विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.