Pakistan Afghanistan Airstrike : पाकिस्तानने पुन्हा एकदा रात्रीच्या अंधारात अफगाणिस्तानवर हवाई हल्ला (एअरस्ट्राइक) केला आहे. या हल्ल्यात एका सर्वसामान्य नागरिकाच्या घराला लक्ष्य करण्यात आले. या एअरस्ट्राईकमध्ये ५ लहान मुलांसह एकूण ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यातच रात्रीच्या अंधारात पाकिस्तानने केलेल्या या कारवाईमुळे सीमाभागात पुन्हा एकदा दहशतीचे आणि युद्धाचे ढग दाटले आहेत.
अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहे. तालिबान सरकारने सांगितले की, गुरुवारी पहाटे झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला मध्यरात्री ३ वाजता झाला. तीन महिन्यांच्या शांततेनंतर दक्षिण आशियातील या दोन शेजारी देशांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे.
तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी एक्सवर सांगितले की, या हल्ल्यांमध्ये कुनार आणि हेलमंद प्रांतांमधील तीन घरे उद्ध्वस्त झाली. त्याने सांगितले की, महिला आणि मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, तालिबानच्या एका प्रवक्त्याने म्हटले, "आम्ही या कृत्याचा निषेध करतो. हा सर्वमान्य तत्त्वांचे उल्लंघन करून केलेला हल्ला आणि गुन्हा आहे."
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराने प्रतिक्रियेच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद दिला नाही. एकेकाळी मित्रराष्ट्र असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव दहशतवादावरून वाढत आहे. काबूलमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला जात असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. तालिबान सरकार हा आरोप फेटाळून लावत दहशतवाद ही पाकिस्तानची अंतर्गत समस्या असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.