गळाभेट करत आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण|VIDEO

Aaditya Thackeray Meets Amit Thackeray On Birthday: आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे भेट देत शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे ठाकरे कुटुंबातील एकोपा सोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

मराठीचा मुद्दा आणि महापालिकेच्या निवडणुकी दरम्यान ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात पहिल्यांदाच एक वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीगाठीने ठाकरे कुटुंबातील ओलावा हा वाढतच गेला. अशातच आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यातील देखील बंधूभाव अधिकच वाढत आहे. आशातच आज अमित ठाकरे यांच्या वाढदिवस आहे. यानिमित्ताने आज आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले. शिवतीर्थ येथे झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. या भेटीमुळे केवळ कौटुंबिक नव्हे, तर राजकीय स्तरावरही विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com