ठाण्यामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. ठाकरेसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रदीप पुर्णेकर हे आपल्या ऑफिसमध्ये बसले असता हल्लेखोर तिथे शिरले. त्यांनी पुर्णेकर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या पुर्णेकर यांचा मृत्यू झाला. सध्या जेजे रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या हत्याकांडाच्या घटनेचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना घडली त्यावेळी गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरून गेला. एका मेडिकलमधील सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यामुळे गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण पळताना आणि बाहेर डोकवून पाहताना दिसत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत २ जणांना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे. ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.