Raj thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj thackeray Speech: राज ठाकरे यांनी आज मराठी भाषा विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये खणखणीत भाषण केले. ते नेमकं काय म्हणाले हे १० मुद्द्यातून घ्या जाणून...

Priya More

'महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले आहेत. राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी भाषा विजय दिवस साजरा केला. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारला खडसावून सांगितले. त्यांनी थेट 'कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा.', असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरे यांच्या खणखणीत भाषणातील १० महत्वाचे मुद्दे काय आहेत वाचा सविस्तर...

- आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. आज जवळपास २० वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो.

- कोणत्याही वादापेक्षा आणि कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं. ते आज देवेंद्र फडणवीसांना जमलं.

- कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे आणि महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचे नाही.

- तुमच्याकडे सत्ता असेल तर विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर.

- हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा पुढे करून यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का? त्यासाठी आगोदर भाषेला डिवचून पाहिले.

- कुणाची माय व्यायली आहे त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत हात घालून दाखवावा. काय मस्करी वाटली का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. काहीही अंगावर लादायचा प्रयत्न करू नका.

- महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय होते हे राज्यकर्त्यांना कळाले. त्याशिवाय त्यांनी माघार नाही घेतली.

- हिंदीभाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. ज्या राज्यांना आर्थिक विकास करता आला नाही आणि आम्ही त्यांची हिंदी भाषा शिकायची का? हिंदी न बोलणारी राज्ये आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत

- बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या अभिमानाबद्दल तडजोड नाही केली. ते म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. आजपर्यंत काय वाकडे झाले?

- यांचं पुढचं राजकारण म्हणजे पुन्हा जातीत विभागायला सुरूवात करतील. पुन्हा जातीत तुम्हाला विभागतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही.

- विनाकारण कुणाला मारायची गरज नाही. पण जास्त नाटकी केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT