Siddhi Hande
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकाच मंचावर एकत्र येणार आहे.
याआधी २००५ मध्ये म्हणजेच २० वर्षांपूर्वी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर शेवटचे एकत्र आले होते.
२००५ मध्ये महाबळेश्वरच्या अधिवेशनात ठाकरे बंधू एकत्र होते.
२००६ साली राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर एकदाही हे दोघेजण कोणत्याही मंचावर एकत्र आले नाही.
२००६ नंतर अनेक कौटुंबिक कार्यक्रमात हे दोघेजण एकत्र दिसले होते. परंतु मंचावर २० वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.
२००५ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं होतं. त्यानंतरच राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली होती.
राज ठाकरेंनी २६ नोव्हेंबर २००५ रोजी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यावेळी त्यांनी भावनिक भाषणदेखील केले होते.