Siddhi Hande
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज तब्बल १९ वर्षानंतर एकाच मंचावर येणार आहेत.
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खूप वर्षांनी एकत्र येणार असल्याने सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.
राज ठाकरे यांचं बालपण आणि शिक्षण दोन्ही दादरमध्ये झालं आहे.
राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन विद्या मंदिर या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
यानंतर राज ठाकरे यांनी सर जे. जे स्कूल आर्ट्समधून शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी फोटोग्राफी हा मुख्य विषय घेऊन पदवी प्राप्त केली आहे.
राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकारदेखील आहेत. ते नेहमी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आवाज उठवत असतात.