Siddhi Hande
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव आहे.
राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला.
राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आहेत. त्यांना लहानपणापासूनच घरात राजकारणाचे बाळकडू मिळाले.
राज ठाकरे यांचं खरं नाव स्वरराज ठाकरे असं आहे.
राज ठाकरे यांच्या आईवडिलांनी त्यांचे नाव स्वरराज ठाकरे असं ठेवलं होतं.
स्वरराज या नावानेच त्यांनी करिअरची सुरुवात केली. त्याच नावाने ते व्यंगचित्र करायचे.
एके दिवशी बाळासाहेबर ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेतले आणि राज ठाकरे या नावाने तू काम करायचं, असं सांगितलं.
यानंतर राज ठाकरे हे नाव ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना राज या नावानेच ओळखले जाते.