Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Raj Thackeray On Maharashtra Government: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा विजय दिवस साजरा करताना सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी त्यांनी युतीचे संकेत देखील दिले. दोन्ही भावांना एकाच मंचावर पाहून कार्यकर्ते आनंदी झाले.
Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत
Raj ThackeraySaam Tv
Published On

'महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र राहणार आहोत. महाराष्ट्रात सन्माननिय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारावे यासाठी आम्ही एकत्र असणार आहोत.', असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी भाषा विजय दिवस साजरा केला. यानिमित्ताने २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरेंनी यावेळी भाषण करताना थेट सरकारवर जोरदार टीका केली.

तसंच, 'हिंदी भाषा बोलणारी राज्यच आर्थिकदृष्या मागास आहेत. ज्या राज्यांना आर्थिक विकास करता आला नाही आणि आम्ही त्यांची हिंदी भाषा शिकायची का? हिंदी भाषासाठी वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही चांगलीच असते. एक भाषा उभी करायला खूप मेहनत असते. अशाच भाषा उभ्या राहत नाहीत. हा भाषेचा मुद्दा कुठून आला. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केले. इतक्या प्रदेशावर आम्ही राज्य केले तर आम्ही मराठी लादली का? मराठा साम्राज्य सगळीकडे पसरले होते तेव्हा आम्ही मराठी लादली का? महाराजांच्या काळात हिंदी भाषा नव्हती ती २०० वर्षापू्र्वी आली.', असा इतिहास सांगत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत
Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकले यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यावर आता राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. 'आम्ही मराठी माध्यमात शिकलो. आमची मुलं इंग्रजीत शिकले. तर आम्हाला विचारचात हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकतात. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजीबद्दल शिकले होते. त्या दोघांबदद्ल तुम्ही शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी क्रॉन्वेंट स्कूलमध्ये शिकले होते. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? दक्षिण भारतात बघा तमिळ, तेलगूच्या प्रश्नांवर सर्व एकत्र उभे राहतात. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुमचा कडवटपणा तुम्ही कुठून शिक्षण घेतेले यामध्ये नसतो. बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या अभिमानाबद्दल तडजोड नाही केली. म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. आजपर्यंत काय वाकडे झाले?', असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला.

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत
Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

सरकार पुढे काय राजकारण करणार याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'यांचं पुढचं राजकारण म्हणजे पुन्हा जातीत विभागायला सुरूवात करतील. पुन्हा जातीत तुम्हाला विभागतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही.' यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे देखील सांगितले की, 'विनाकारण कुणाला मारायची गरज नाही. पण जास्त नाटकी केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे. असं कोणतीही गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. आपले आपल्यामध्येच त्यांना कळाले पाहिजे. मारणारा कधी सांगत नाही तर मार खाणारा सांगत असतो मला मारलं. याचा अर्थ उटसूट कुणाला मारायचे नाही.'

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत
Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवांची मुजोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com