police  Saam tv
मुंबई/पुणे

पोलीस निरीक्षक १ लाखांची लाच घेताला रंगेहाथ सापडला; पोलीस विभागात उडाली खळबळ

yavatmal Police bribery case : पोलीस निरीक्षक १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. या कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली.

Saam Tv

पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक

नरेश रणधीर असे आरोपी पोलिसाचे नाव

कारवाईने पोलीस दलात खळबळ

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली. नरेश रणधीर असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी लाचेची मागणी केली होती. लाच प्रकरणातील कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराने त्याच्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये सहा महिन्यांसाठी मिळवून दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाहीत. याप्रकरणी तक्रारदाराने 10 डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी अमरावती एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

एसीबीकडून सापळा रचत रणधीर यांना अटक

आज शुक्रवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत रणधीर यांनी 3 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दुपारी दरम्यान अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नरेश रमेशराव रणधीर (वय ५२) हे मूळचे अंमळनेर (जळगाव) येथील रहिवासी आहेत. ते सध्या यवतमाळ येथे कार्यरत आहेत.त्यांच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आता या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT