PM Modi Launches 90 Rupees Coin Google
मुंबई/पुणे

PM Modi: आरबीआयला 90 वर्ष पूर्ण, मोदींच्या हस्ते 90 रुपयांच्या नाण्याचं अनावरण; एक नाणं खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

PM Modi Launches 90 Rupees Coin: रिझर्व्ह बँकेला ९० वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलं आहे.

Rohini Gudaghe

PM Narendra Modi Launches 90 Rupees Coin

रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) 90 रुपयांच्या नाण्याचं आज अनावरण केलं आहे. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते 40 ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. एक नाणं खरेदी करण्यासाठी अंदाजे 5200 ते 5500 रुपये खर्च करावे लागणार आहेत.  (Latest Marathi News)

रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचं नाणं जारी केलं आहे. देशात प्रथमच 90 रुपयांचं नाणे जारी करण्यात आलं आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचं (PM Modi Launches 90 Rupees Coin) आहे. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आलाय. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे. दुसऱ्या बाजूला 90 रुपये असा मजकूर लिहिलेला आहे.(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेलं आहे. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आणि वरच्या बाजूला हिंदीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालच्या बाजूवर इंग्रजीमध्ये लिहिलेलं (90 Rupees Coin) आहे. लोगोच्या खाली RBI @90 असं लिहिलेलं आहे.

भारत सरकारच्या टांकसाळीत बनवलेल्या या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम असेल. हे नाणे 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनवलेले आहे. याआधीही 1985 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुवर्ण जयंती आणि 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्लॅटिनम ज्युबलीवर नाणी जारी करण्यात आली आहेत.

नव्वद रुपयांचं हे नाणे लाँच केल्यानंतर त्याची दर्शनी मूल्यापेक्षा अधिक प्रीमियमवर विक्री केली जाणार आहे. या नाण्याची किंमत किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता वर्तविली जात (PM Modi News) आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने 19 मार्च 2024 रोजी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना जारी केली होती.

आरबीआयच्या 90 वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआयच्या कामाचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या (RBI 90 Years) असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT