PM Narendra Modi : कच्चाथीवू बेटाच्या मुद्द्यावरून PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Kachchatheevu : कच्चाथीवू बेट हिंदी महासागरात भारताच्या दक्षिण टोकाला आहे. भारताचे रामेश्वरम आणि श्रीलंका यांच्यामध्ये हे बेट वसलेले आहे. जवळपास 285 एकरमध्ये हे पसरले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam TV

Island in Sri Lanka :

कच्चाथीवू बेटाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंदिरा गांधींनी १९७४ साली एका करारानुसार, हे बेट श्रीलंकेला सुपूर्द केले होते, हे आरटीआय द्वारे उघड झाले आहे. या खुलाशानंतर पीएम मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

PM Narendra Modi
Badlapur Shri Ram Mahotsav : बदलापूरात श्रीराम महोत्सव, साेमवारी मांस, मद्य विक्री बंद ठेवावी : भाजपची मागणी

आरटीआय अहवाल 'डोळे उघडणारा आणि धक्कादायक' असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. लोक या कृतीमुळे संतापले आहेत आणि काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांनी लिहिले की,'डोळे उघडणारे आणि धक्कादायक, नवीन तथ्यांमधून दिसून येतंय की काँग्रेसने क्रूरपणे कच्चाथीवूला काय दिले.

प्रत्येक भारतीयाला याबद्दल राग आहे आणि आपण काँग्रेसवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही, हे पुन्हा एकदा लोकांच्या मनात पक्के झाले आहे. भारताची एकता, अखंडता आणि हितसंबंध धोक्यात आणणे ही काँग्रेसची ७५ वर्षांपासूनची मोडस ऑपरेंडी आहे.'

कच्चाथीवू बेट कुठे आहे?

कच्चाथीवू बेट हिंदी महासागरात भारताच्या दक्षिण टोकाला आहे. भारताचे रामेश्वरम आणि श्रीलंका यांच्यामध्ये हे बेट वसलेले आहे. जवळपास 285 एकरमध्ये हे पसरले आहे. 17 व्या शतकात मदुराईचे राजा रामानंद यांच्या ताब्यात होते. ब्रिटीश राजवटीत हे बेट मद्रास प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आले.

1921 मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी या जागेवर मासेमारीसाठी दावा केला होता. मात्र त्यानंतर त्यात विशेष काही घडले नाही. स्वातंत्र्यानंतर 1974-76 दरम्यान सागरी सीमांबाबत चार करार झाले. ज्या अंतर्गत भारतीय मच्छिमारांना या बेटावर विश्रांती आणि त्यांची जाळी सुकवण्याची परवानगी देण्यात आली होती.

PM Narendra Modi
Indian Navy Rescues: समुद्री चाच्यांपासून वाचवल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी दिल्या 'भारत झिंदाबाद'च्या घोषणा, VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com