Indian Navy Rescues: समुद्री चाच्यांपासून वाचवल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी दिल्या 'भारत झिंदाबाद'च्या घोषणा, VIDEO समोर

Indian Navy Rescues Pakistani Nationals From Pirates: भारतीय नौदलाने 23 पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली आहे. त्यानंतर या पाकिस्तानी नागरिकांनी भारत जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत.
Indian Navy Rescues
Indian Navy RescuesX accont
Published On

Indian Navy Rescues Pakistani Nationals From Pirates Video

भारतीय नौदलाने (Indian Navy) २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली आहे. हे पाकिस्तानी नागरिक इराणहून येत होते. अरबी समुद्रात चाच्यांनी त्यांचं अपहरण केलं होतं. भारतीय नौदलाने वाचवल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी 'आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत' असं सांगितलं. त्यांनी नौदलाचे आभारही मानले. त्यानंतर त्यांनी 'भारत झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या (Rescues Pakistani Nationals) आहोत.  (Latest Marathi News)

भारतीय नौदलाने पाकिस्तानी नागरिकांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी नागरिक जहाजावर सुरक्षित दिसत आहेत. एफव्ही एआय कंबार ७८६ नावाच्या बोटीने ते इराणहून निघाले (Indian Navy Rescues) होते. पण त्यांना अरबी समुद्रात चाच्यांनी घेरलं त्यांचं अपहरण केलं. नौदलाने जहाजाचे अपहरण करणाऱ्या ९ सशस्त्र समुद्री चाच्यांना अटक केली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'

पाकिस्तानी नागरिकांची सुटका

नौदलाने सांगितलं की, २८ मार्च रोजी इराणी मासेमारी जहाज एआय कंबर ७८६ चं अपहरण झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. येमेनच्या नैऋत्येकडील सोकोत्रा ​​येथून ९० नॉटिकल मैल अंतरावर चाच्यांनी हे अपहरण केल्याचं स्पष्ट झालं (India Zindabad) आहे. यानंतर नौदलाने दोन नौदल जहाजांसह बचाव मोहिम सुरू केली होती.

भारतीय नौदलाच्या यशस्वी कारवाईमध्ये नऊ समुद्री चाच्यांना अटक करण्यात आली आहे. या मोहिमेत २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. अपहृत जहाज आयएनएस त्रिशूलसह आयएनएस सुमेधाने (Indian Navy Rescue Operation) अडवले. १२ तासांच्या संघर्षानंतर अखेर समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केलं. भारतीय नौदलाने पाकिस्तानी नागरिकांचे प्राण वाचवले. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचं नौदलाने एका निवेदनात सांगितलं आहे.

Indian Navy Rescues
Mumbai Indians: सलग २ पराभवानंतर मुंबईला मोठा धक्का! विस्फोटक फलंदाज आणखी काही सामन्यांना मुकणार

एफव्ही जहाजावरील समुद्री चाच्यांना (Pirates)आत्मसमर्पण करण्यास भारतीय नौदलाने भाग पाडले. त्यांनी २३ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेल्या क्रूची सुखरूप सुटका केली, असं नौदलाने एका निवेदनात म्हटलंय. याप्रकरणी नौदलाने सांगितलं आहे की, मासेमारी सुरू ठेवण्यासाठी जहाजाला बाहेर काढण्यापूर्वी २३ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेल्या क्रूची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

Indian Navy Rescues
Indian Navy : 3 महिने सोमालीयन चाच्यांच्या ताब्यात असलेल्या जहाजाची सुटका; ३५ सशस्त्र चाच्यांना घेललं ताब्यात, पहा भारतीय नौदलाचा थरारक Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com