Qatar Indian soldiers: भारताच्या माजी ८ नौदल अधिकाऱ्यांना दिलासा; फाशीच्या शिक्षेला स्थगिती

Indian soldiers: कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या ८ भारतीय नौसैनिकांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिला
Indian soldiers
Indian soldiersSaam Tv
Published On

Indian Navy personnel imprisoned In Qatar:

कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या ८ भारतीय नौसैनिकांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आलीय. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिलाय. ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. कतारमधील भारतीय राजदूत आणि इतर अधिकारी उपस्थित होते, त्यांनी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसह न्यायालयात दाद मागितली होती. (Latest News)

कतारमधील दाहरा ग्लोबल प्रकरणात भारताच्या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीच्या शिक्षा सुनवण्यात आली होती. या माजी सैनिकांना (soldiers) वाचवण्यासाठी भारत सरकारने (Government of India) कोणतीही कसर सोडली नाही. यासाठी सरकारने माजी नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात कतारच्या दुसऱ्या न्यायालयात अपील दाखल केले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कतारमधील आमचे राजदूत आणि इतर अधिकारी आज अपील कोर्टात कुटुंबातील सदस्यांसह उपस्थित होते. या प्रकरणातील तपशीलवार निकालाची प्रतीक्षा आहे आणि ते कतारमधील कायदेशीर टीमच्या जवळच्या संपर्कात आहेत. याप्रकरणातील निकालाची प्रतीक्षा आहे. पुढची पायरी ठरवण्यासाठी आम्ही कायदेशीर टीम तसेच अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आहोत.

आम्ही खटल्याच्या सुरुवातीपासून माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर मदत देत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू, असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

कतारने आठ नौदलाच्या अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप केला होता. कतारच्या सुरक्षा एजन्सीने ३० ऑगस्ट रोजी सर्वांना अटक करण्यात आली होती. हे सर्व भारतीय नौदलातून निवृत्त होऊन दोहा येथील अल-दहरा कंपनीत काम करत होते. या सर्वांवर इस्रायलसाठी कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित माहिती चोरल्याचा आरोप होता.

अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर भारत सरकारला याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारत सरकार या प्रकरणाचा मागोवा घेत आहे. या प्रकरणात आधी परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणी सुनावणीची माहिती दिली होती. दोन सुनावणी झाल्या आहेत.आम्ही कुटुंबियांसह याचिका दाखल केली आहे. त्यानंतर दोन सुनावणी झाली. एक २३ नोव्हेंबरला आणि दुसरी ३० नोव्हेंबरला झाली होती.

Indian soldiers
INS Imphal: इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सागरी सुरक्षेत आयएनएस इम्फाळ महत्त्वाची भूमिका बजावेल: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com