रविवारी (३१ मार्च) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पहिल्यांदाच इलेक्टोरल बाँड्सवर बोलले आहेत. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जे लोक इलेक्टोरल बॉण्ड्सना (Electoral Bonds) विरोध करत आहेत, त्यांना लवकरच पश्चाताप होईल.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी निवडणूक रोख्यांवर चर्चा केली आहे. यावर टीका करणाऱ्यांना पश्चाताप करावा लागेल, असेही ते म्हणाले. 2014 च्या आधी निवडणुका (PM Modi On Electoral Bonds) झाल्या. तेव्हा कोणती एजन्सी सांगू शकते की पैसा कुठून आला आणि गेला कुठे? आम्ही इलेक्टोरल बाँड आणले. त्यामुळे आज तुम्ही सांगू शकाल की कोणी कोणाला किती आणि कसे दिले. अन्यथा ते कळालं नसतं. कोणतीही व्यवस्था परिपूर्ण असू शकत नाही. काही कमतरता असू शकते, उणीवा दूर केल्या जाऊ शकतात.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पीएम मोदी पुढे म्हणाले की, 2014 पूर्वी राजकीय पक्षांना दिलेल्या निधीची कोणतीही माहिती नव्हती. पण आता पक्षांना मिळणारा निधी इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून शोधला जाऊ (PM Narendra Modi News) शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्टोरल बाँड्सवर जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर, SBI बँकेने निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती दिली होती. ती आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पीएम मोदी म्हणाले की, यावेळी भाजपने मिशन 400 आहे. यावेळी भाजपला प्रचंड बहुमत देऊन 400 जागांवर विजयी करायचं हे जनतेने आधीच ठरवलं (Electoral Bonds Criticism) आहे, असेही ते म्हणाले आहेत.सर्वसामान्यांना आता राजकीय स्थैर्य हवं आहे. लोकांना स्थिर सरकारचं त्यांच्या मताचं महत्त्व माहित आहे. लोकांच्या मतांमुळेच आज गरिबांना अन्न आणि आरोग्याचे फायदे मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.