Maharashtra Petrol Supply Shortage News Saam tv
मुंबई/पुणे

Petrol News : पेट्रोल संपलं? वाहनचालकांनी पेट्रोल पंपाबाहेर केली मोठी गर्दी, राज्यभरात कुठे काय परिस्थिती?

Petrol Supply Shortage News : पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसतानाही अफवेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी पंपांवर मोठी गर्दी झाली आहे. प्रशासनाने पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Alisha Khedekar

  • पेट्रोल संपण्याच्या अफवेमुळे पंपांवर मोठी गर्दी

  • प्रत्यक्षात इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू

  • राज्यातील अनेक शहरांमध्ये रांगा

  • प्रशासनाने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

आखाती देशांमध्ये महिनाभर युद्ध सुरु आहे. अमेरिका, इराण आणि इस्त्राईल या देशांच्या युद्धामुळे भारताला फटका बसला आहे. स्वयंपाक घरापासून ते अगदी वाहनांपर्यंत मोठा परिणाम दिसून येत आहे. गॅसच्या टंचाईमुळे नागरिकांनी एजन्सीबाहेर लांबलचक रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या अशातच आता पेट्रोल संपण्याच्या अफवेने आणि भीतीने वाहनधारकांनी राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर देखील गर्दी केलेली पाहायला मिळतेय.

कल्याणमध्ये पेट्रोल पंपावर तोबा गर्दी

राज्यभरात पेट्रोल बंद होण्याच्या अफेने एकच धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे. कल्याणमध्ये देखील नागरिकांनी आपली वाहन घेऊन सकाळपासूनच कल्याण डोंबिवली मधील प्रत्येक पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचा पाहायला मिळालं होतं. या गर्दीमुळे संध्याकाळपर्यंत पेट्रोल पंपावरील पेट्रोलचा साठा संपला आणि पंप बंद करण्यात आला. दरम्यान पुन्हा तो चालू करण्यात येईल असं पंप चालकांनी म्हटले.

नाशिकमध्ये पेट्रोल पंप बंद?

नाशिकच्या मनमाड शहरा पासून काही अंतरावर असलेल्या पानेवाडी टर्मिनल येथून रोज आय ओ सी,भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी मधून सुरळीतपणे पेट्रोल,डिझेलचा पुरवठा सुरू असताना, अचानक पसरलेल्या अफवेमुळे मनमाड शहरातील पेट्रोल पंपावर रात्री पेट्रोल भरण्यासाठी वाहन धारकांनी रांगा लावल्या आणि बघता बघता तोबा गर्दी झाली.

पालघरमध्ये पेट्रोलचा तुटवडा?

पालघर, बोईसर , मासवण,चारोटी ,विक्रमगड परिसरात देखील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा नसून पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या नंतर ही पेट्रोल डिझेल संपेल आणि महाग होईल, या भीतीपोटी नागरिकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केल्याचे पहायला मिळाले.

नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा

नांदेडमध्ये रात्रीपासुन पेट्रोल पंपावर गर्दी झाली.पेट्रोल मिळणार नाहीं अशा अफवामुळे पंपावर रांगा लागल्या. शहरासह ग्रामीण भागात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.मोठया टाक्या , कॅन घेउन नागरिक रांगा लावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यातील लॉजवर बंद दाराआड सुरु होता भयंकर प्रकार! पोलिसांनी धाड टाकताच ९ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या

Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळं शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल

Women Reservation bill : महिला आरक्षणावर बोलताना पंतप्रधान मोदींची विरोधकांना खुली ऑफर; म्हणाले, मी ब्लँक चेक देतो, पण...

Crime: मैत्रिणीसोबत जाणाऱ्या मुलीचं अपहरण, शेतात ओढत नेऊन सामूहिक बलात्कार

Pune–Bengaluru Expressway: १५ तासाचा प्रवास ७ तासात होईल पूर्ण; गेमचेंजर ठरेल पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड; 'या' गावाचा होईल कायापालट

SCROLL FOR NEXT