pathardi shevgaon farmers rasta roko andolan at kalyan nirmal highway Saam Tv
मुंबई/पुणे

Nagar News : पाथर्डी, शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतक-यांनी कल्याण - निर्मल राष्ट्रीय महामार्ग राेखला

भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेतक-यांचे प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा शेतक-यांनी व्यक्त केली.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News :

पाथर्डी शेवगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये यावर्षी पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडलेला असल्यामुळे संपूर्ण पाथर्डी (pathardi) आणि शेवगाव (shevgaon) तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच दोन्हीही तालुक्यांमध्ये चारा छावण्या चालू करा आदी मागण्यांसाठी आज (शुक्रवार) शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तिसगाव येथे कल्याण - निर्मल राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (farmers rasta roko andolan at kalyan nirmal highway) केले. या आंदाेलनामुळे जवळपास एक तास या महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. (Maharashtra News)

पाथर्डी शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, जनावरांसाठी चारा छावण्या चालू कराव्यात, शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा तसेच शेतकऱ्यांना शेती विषयी शासकीय अनुदान मंजूर करावे विविध मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आले. जर शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर पुढील काळात बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा तुळशीराम सानप यांनी यावेळी दिला.

पाथर्डी शेवगाव तालुक्यात भाजपचे आमदार मोनिकाताई राजळे या लोकप्रतिनिधी असून त्यांच्या पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही पाथर्डी सारख्या दुष्काळग्रस्त भागाला आतापर्यंत कोणती मदत मिळाली नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नसल्यामुळे ते सरकार दरबारी काहीच प्रयत्न करत नसल्याचे पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड यांनी सांगितले. विशेष म्हणजे गोकुळ दाैंड हे भाजपचे नेते असून त्यांनीच आपल्या पक्षातील आमदारावर टीका केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT